सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:46 IST2020-07-16T14:45:47+5:302020-07-16T14:46:26+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता एक महिना उलटून गेला आहे. अद्याप पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. कारण चौकशीसाठी पुरेसे पुरावे नाहीत. मात्र सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतचे पैसे खर्च केल्याची बाब समोर आली आहे. किती पैसे खर्च केले आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये नंतर सोशल मीडियावर यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शन्सचे करण जोहर यांच्यावर सुशांत सिंग राजपूतला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पण पोलिस तपासाता आतापर्यंत त्यांच्याविरोधात असे काही ठोस कारण समोर आले नाही.
संजय लीला भन्साळी यांच्या जबाबानंतर आदित्य चोप्रा यांची अडचण कमी झाली. आतापर्यंत 35 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यांच्यापैकी कुणीच आपल्या जबाबात करण जोहरवर सुशांतला त्रास दिल्याचा आरोप केला नाही.
पोलिसांच्या नुसार सुशांत खूपच सेेंसिटिव्ह व्यक्ती होता आणि तो त्याच्याबद्दलच्या अफवा किंवा चुकीच्या न्यूजमुळे त्रस्त व्हायचा. पण हे पोलिस हे सिद्ध करू शकले नाहीत.
पोलिस तपासात रिया चक्रवर्तीने सुशांतचे पैसे खर्च केल्याची बाब समोर आली आहे. पण किती रक्कम हे समजले नाही. त्यामुळे याची चौकशी होणार आहे. तसेच पोलीस लवकरच सुशांतचा डॉक्टर व त्याच्या बहिणीचा जबाब नोंदवणार आहे.