तेच डोळे, तोच चेहरा! अभिनेत्यासारखा दिसणाऱ्या तरुणाला पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 09:56 IST2024-05-20T09:55:40+5:302024-05-20T09:56:09+5:30

Sushant singh rajput: सुशांतसारख्य दिसणाऱ्या तरुणाला पाहिल्यावर तुम्हीदेखील व्हाल थक्क, पाहा त्याचे व्हायरल व्हिडीओ

sushant-singh-rajput-look-alike-video-goes-viral-on-social-media-fans-get-emotional | तेच डोळे, तोच चेहरा! अभिनेत्यासारखा दिसणाऱ्या तरुणाला पाहून चाहते थक्क

तेच डोळे, तोच चेहरा! अभिनेत्यासारखा दिसणाऱ्या तरुणाला पाहून चाहते थक्क

'केदारनाथ', 'काय पो छे', 'दिल बेचारा', 'एम.एस. धोनी' असे कितीतरी सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला देणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput). २०२० मध्ये सुशांतने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, सुशांतने खरोखरच आत्महत्या केली की हा घातपात आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागचं गुढ कायम आहे. सोशल मीडियावर सुशांतविषयी दररोज नवनवीन चर्चा रंगत असतात. परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा तरुण चर्चेत आला आहे.

बऱ्याचदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींसारखे दिसणारे, त्यांच्यासारखा लूक करणारे चाहते चर्चेत येत असतात. यात शाहरुख खान, सलमान खान वा सुनील शेट्टी यांच्यासारख्या दिसणाऱ्या अनेकांना आपण पाहिलं आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर ज्या तरुणाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतायेत तो अगदी सेम टू सेम सुशांत सिंह राजपूत सारखा दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला पाहून अनेक जण गोंधळून गेले आहेत.

सुशांत सिंह सारख्या दिसणाऱ्या या तरुणाचं नाव अयान असं असून त्याचं donim_ayaan1513 या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या अकाऊंटवर त्याने त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तो अगदी सुशांतसारखा दिसत असल्यामुळे चाहते सुद्धा थक्क झाले आहेत.

Web Title: sushant-singh-rajput-look-alike-video-goes-viral-on-social-media-fans-get-emotional