पॉडकास्टमध्ये जाण्यासाठी सेलिब्रिटी ३० लाख घेतात! बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला- "मलादेखील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:21 IST2025-05-30T15:20:03+5:302025-05-30T15:21:43+5:30
फेमस पॉडकास्टमध्ये हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटी लाखोंमध्ये पैसे घेत असल्याचा खुलासा बॉलिवूड अभिनेत्याने केला आहे. सूरज पांचोलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

पॉडकास्टमध्ये जाण्यासाठी सेलिब्रिटी ३० लाख घेतात! बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला- "मलादेखील..."
सेलिब्रिटी अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतात. अनेक पॉडकास्टमध्येही सेलिब्रिटी हजेरी लावतात. कधी सिनेमाचं प्रमोशन म्हणून तर कधी पर्सनल इंटरव्ह्यू सेलिब्रिटी देत असतात. पण, फेमस पॉडकास्टमध्ये हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटी लाखोंमध्ये पैसे घेत असल्याचा खुलासा बॉलिवूड अभिनेत्याने केला आहे. सूरज पांचोलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.
सूरज पांचोलीने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो मजेशीरपणे म्हणाला, "मी असं ऐकलंय की काही सेलिब्रिटी हे पॉडकास्टमध्ये येण्यासाठी ३० लाख रुपये घेतात. हे खरं आहे का? मला हे जाणून घ्यायचं आहे कारण मी इथे फ्रीमध्ये आलो आहे. मला कमीत कमी ३० हजार रुपये मिळाले पाहिजेत". सूरजच्या या वक्तव्यानंतर मुलाखतकारानेही त्याला हसून उत्तर देत आता पॉडकास्ट करणारेच सेलिब्रिटींकडून पैसे घेत असल्याचं म्हटलं.
त्यावर सूरज म्हणाला, "हो मी पण हे ऐकलं आहे. ज्या पॉडकास्टर्सला चांगले व्ह्यूज असतात. ते तुम्हाला त्यांच्या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी ३० लाख रुपये चार्ज करतात. मलादेखील अशी विचारणा झाली होती. पण, ते व्ह्यूअरशिप देत असल्यामुळे हे मला ठीक वाटतं. त्यांनी त्यांचं चॅनेल ग्रो करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे यात मला काही चुकीचं वाटत नाही".
दरम्यान, सूरज पांचोली त्याच्या आगामी 'केसरी वीर' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यग्र आहे. 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पांचोली योद्ध्याच्या भूमिकेत आहेत. 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केलं आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय नकारात्मक भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा शर्मा डेब्यू करते आहे. सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित हा सिनेमा २३ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.