...म्हणून बायोपिकच्या शूटिंग वेळी सनी रात्र-रात्र एकटी रडत असे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 14:13 IST2018-07-10T14:11:57+5:302018-07-10T14:13:21+5:30
‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ या सनीच्या बायोपिकचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.

...म्हणून बायोपिकच्या शूटिंग वेळी सनी रात्र-रात्र एकटी रडत असे!
मुंबई : ‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ या सनीच्या बायोपिकचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या ट्रेलरमधून करनजीत कौरचा सनी लिओनी बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. या ट्रेलरमधून अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्या तुम्ही सनीबाबत याआधी कधीही ऐकल्या नसतील. पण आता याच गोष्टी सनीला सांगायच्या आहेत.
सनी म्हणाली की, भूतकाळातील गोष्टी आठवताना अनेक जुन्या जखमा ताज्या होत होत्या. खासकरुन तिच्या आई-वडिलांचा मृत्यू. सनीने सांगितले की, जुन्या गोष्टी आठवल्यावर ती अनेक रात्री रडत असे. कारण तिला त्यातील अनेक गोष्टींता त्रास होत असे. सनी म्हणाली की, तिला अनेक गोष्टी सांगायच्या नव्हत्या. पण खूप विचार केल्यानंतर काही गोष्टी तिने समोर आणल्या आहेत.
सनी आता बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तिचा भूतकाळ अजूनही तिचा पाठलाग करतो आहे. आता तिने तिचा हाच भूतकाळ मोठ्या पडद्यावर रेखाटला आहे. त्यामुळे करनजीत कौर सनी लिओनी कशी झाली हे तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.