"आम्हाला थोडी भीती आहे, कारण..."; वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:00 IST2025-10-05T12:57:56+5:302025-10-05T13:00:30+5:30
कतरिना कैफचा दीर आणि अभिनेता सनी कौशलच्या वहिनीच्या गरोदरपणावर काहीशी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला सनी?

"आम्हाला थोडी भीती आहे, कारण..."; वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नंसीवर सनी कौशलची प्रतिक्रिया
बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आई-बाबा होणार आहेत. कतरिना सध्या गरोदर असून ही आनंदाची बातमी तिने काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दरम्यान, कतरिनाचा दीर आणि अभिनेता सनी कौशलने (Sunny Kaushal) याबद्दल एक खास प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय कुटुंबात असलेलं काळजीचं वातावरण सांगितलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सनी कौशलला विकी-कतरिनाला लवकरच आई-बाबा होणार आहेत, त्याविषयी कुटुंबात कसं वातावरण आहे? याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सनीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. तो म्हणाला की, “सगळ्यांना खूप आनंद झाला आहे, पण थोडी भीती सुद्धा आहे की, पुढे काय होईल. पण लवकरच बाळ आमच्यासोबत असणार आहे, आणि आम्ही सर्व त्या दिवसाची वाट पाहत आहोत.”
काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिना यांनी इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली होती. या फोटोत कतरीना बेबी बंप (Baby Bump) धरून उभी होती, तर विकी तिच्या शेजारी हसताना दिसत होता. हा फोटो पोस्ट करताच सर्वांनी विकी-कतरिनावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
बाळाचा जन्म कधी?
कतरिना सध्या तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे. मात्र, विकी आणि कतरिना यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले होते.