बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:33 IST2021-12-24T17:24:37+5:302021-12-24T17:33:58+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशलच्या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या अभिनेत्रीने.

बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) ने अलीकडेच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. दोघेही हनिमूनहून परत आल्यानंतर कामावर परतले आहेत. तर दुसरीकडे, या लग्नापासून कतरिना कैफचा दीर सनी कौशल आणि तिची कथित गर्लफ्रेंड शर्वरी वाघ (Sharvari Wagh) चर्चेत आहेत.शर्वरी व सनी यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं म्हटलं जातंय. या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सनी कौशलने नुकतेच 'शिद्दत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ हिने 'बंटी और बबली 2' या चित्रपटातून पदार्पण केले. दोघांनीही आपापल्या चित्रपटात उत्तम काम केले. पहिल्याच चित्रपटातनंतर शर्वरीने बिकिनी घालून आपल्या बोल्ड आणि हॉट अदा दाखवल्या.
कतरिना कैफची जाऊबाई शर्वरी वाघ तिच्या बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे आणि ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. शर्वरीने तिच्या पहिल्याच चित्रपटात जबरदस्त किसिंग सीन आणि बोल्ड सीन दिले होते. शर्वरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
शर्वरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे.शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि आई आर्किटेक्ट आहे.