सनी देओलची पत्नी आणि आई पहिल्यांदाच झाल्या कॅमेऱ्यात कैद, करण देओलच्या लग्नातील Unseen फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:33 IST2023-06-21T12:31:34+5:302023-06-21T12:33:20+5:30

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि मोठी सून या कायम लाइमलाईटपासून दूरच आहेत. देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर येत नाहीत.

Sunny deol wife pooja and mother prakash kaur seen first time karan deol shares wedding pics of entire deol family | सनी देओलची पत्नी आणि आई पहिल्यांदाच झाल्या कॅमेऱ्यात कैद, करण देओलच्या लग्नातील Unseen फोटो व्हायरल

सनी देओलची पत्नी आणि आई पहिल्यांदाच झाल्या कॅमेऱ्यात कैद, करण देओलच्या लग्नातील Unseen फोटो व्हायरल

अलिकडेच, धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा मुलगा करण देओलने द्रिशा आचार्यसोबत लग्न केले. शाही थाटात पार पडलेल्या या लग्नाचे आणि रिसेप्शनचे बरेच इनसाईट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, यात सनी देओल यांची पत्नी पूजा आणि आई प्रकाश कौर यांची कोणतीही झलक दिसली नाही. पण करण देओलने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना चाहत्यांना आई आणि आजीची झलक दाखवली आहे, ज्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. एवढेच नाही तर चाहते देओल कुटुंबाचे कौतुक करताना थकत नाहीत.

काही तासांपूर्वी करण देओलने इंस्टाग्रामवर लग्नातील काही फोटो शेअर केले होते. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "अनेक आशीर्वाद आणि संपूर्ण कुटुंबाचा मिळालेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहोत, मनापासून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. " या फोटोवर पहिली कमेंट करणचा काका बॉबी देओल यांनी हार्ट इमोजी शेअर करत केली होती. यानंतर, चाहते आणि सेलिब्रिटींनी करणच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

करणने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये आजोबा धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत  करण आणि त्याची पत्नी द्रिशा आचार्य सनी देओल आणि त्यांची पत्नी पूजा देओलसोबत पोज देताना दिसत आहेत. करणच्या लग्नादरम्यान पहिल्यांदाच सनी देओल यांची पत्नी कॅमेऱ्यात कैद झाल्या.

सनी देओल पत्नी पूजा देओल मूळची लंडनची आहे. तिचं खरं नाव लिंडा असं आहे. ती कायम प्रसिद्धीझोतापासून दूर राहणंच पसंत करते. 1984 मध्ये सनी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि काही वर्षातच त्याने पूजाशी लग्न केले.  दोघांनी टिपीकल पंजाबी रितीरिवाजात लग्न केलं. मात्र हे लग्न बराच काळ सिक्रेट ठेवलं गेलं. सनीची पत्नी पूजा देओल लेखिका आहे. 'यमला पगला दिवाना'सिनेमाच्या पटकथेमध्ये तिचाही सहभाग होता हे खूप कमी जणांना माहित आहे. दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Sunny deol wife pooja and mother prakash kaur seen first time karan deol shares wedding pics of entire deol family