धर्मेंद्र-शबाना आजमी यांच्या किसींग सीनवर सनी देओल म्हणाला, "माझे वडील काहीही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:21 AM2023-08-07T11:21:59+5:302023-08-07T12:03:32+5:30

वडिलांच्या व्हायरल होत असलेल्या किसींग सीनवर सनी देओल बघा काय म्हणतोय

sunny deol reacts on dharmendra and shabana azmi kissing scene says he can do anything | धर्मेंद्र-शबाना आजमी यांच्या किसींग सीनवर सनी देओल म्हणाला, "माझे वडील काहीही..."

धर्मेंद्र-शबाना आजमी यांच्या किसींग सीनवर सनी देओल म्हणाला, "माझे वडील काहीही..."

googlenewsNext

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा चांगलाच हिट झालाय. एकाच आठवड्यात सिनेमाने 70 कोटींचा गल्ला जमवलाय. बऱ्याच काळाने बॉलिवूडमध्ये करण जोहर दिग्दर्शित फॅमिली ड्रामा परत आलाय. त्याच्या या सिनेमामुळे चाहत्यांना 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' या सिनेमांची आठवण झालीये. तर 'रॉकी और रानी'मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट यांची महत्वाची भूमिका आहे. शिवाय धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आजमी (Shabana Azmi) या दिग्ग्ज कलाकारांचीही लव्हस्टोरी आहे. त्यांचा सिनेमात किसींग सीनही आहे जो सध्या चर्चेत आहे.

धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांच्या किसींग सीनवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांना त्यांचा तो सीन पाहून आश्चर्यच वाटलं. आता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने सुद्धा वडिलांच्या किसींग सीनवर एनडीटीव्हीला  प्रतिक्रिया दिली आहे. सनी म्हणाला, 'माझे वडील काहीही करु शकतात. ते एकमेव असे अभिनेते आहेत जे हे सगळं कॅरी करु शकतात. मी सिनेमा बघितला नाही याबद्दल फक्त ऐकलं आहे. मी खूप कमी चित्रपट पाहतो. स्वत:चेही फारसे सिनेमे मी पाहिलेले नाहीत.' 

शबाना आजमी-धर्मेंद्र यांच्या किसींग सीनवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'ही महिला...'

तो पुढे हसतच म्हणाला, 'वडिलांच्या किसींग सीनवर मी त्यांच्याशीच कसं काय बोलू शकतो. त्यांचं सहज, सुंदर आणि प्रामाणिक असं व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्या व्यक्तिरेखेतही दिसतं. ते काहीही सहज कॅरी करु शकतात.' अशा शब्दात सनीने वडिलांचं कौतुक केलं.

धर्मेंद्र-शबाना आजमी यांचा 'तो' किसींग सीन, हेमा मालिनी म्हणाल्या, "मी धरमजींसाठी..."

एकीकडे धर्मेंद्र यांनी जबरदस्त कमबॅक केलेलं असताना सनी देओलही 'गदर 2' मुळे चर्चेत आहे. 2001 साली आलेल्या सुपरहिट 'गदर' सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. तारासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ११ ऑगस्ट रोजी 'गदर 2' प्रदर्शित होतोय.

Web Title: sunny deol reacts on dharmendra and shabana azmi kissing scene says he can do anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.