'बॉर्डर २' नंतर आता सनी देओलचा 'लाहौर १९४७' 'या' दिवशी रिलीज होणार, निर्माता आमिर खानने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:00 IST2026-02-09T17:58:36+5:302026-02-09T18:00:31+5:30

बॉलिवूडचा 'अँग्री यंग मॅन' सनी देओल आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी या जोडीच्या आगामी 'लाहौर १९४७' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख समोर आली असून आमिर खान प्रोडक्शन्सने ही घोषणा केली आहे

Sunny Deol 'Lahore 1947' will be released on independence day producer Aamir Khan gave information | 'बॉर्डर २' नंतर आता सनी देओलचा 'लाहौर १९४७' 'या' दिवशी रिलीज होणार, निर्माता आमिर खानने दिली माहिती

'बॉर्डर २' नंतर आता सनी देओलचा 'लाहौर १९४७' 'या' दिवशी रिलीज होणार, निर्माता आमिर खानने दिली माहिती

बॉलिवूडचा 'अँग्री यंग मॅन' सनी देओल आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी या जोडीच्या आगामी 'लाहौर १९४७' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख समोर आली असून आमिर खान प्रोडक्शन्सने ही घोषणा केली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज व्यक्तिमत्त्वे पहिल्यांदाच एकत्र आली आहेत. सनी देओल मुख्य भूमिकेत असून राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, तर आमिर खान या चित्रपटाचा निर्माता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलताना आमिर खानने भावनिक आठवण शेअर केली. त्याने सांगितले की, या चित्रपटाची कथा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना खूप आवडली होती. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर तो पाहण्यासाठी धर्मेंद्र आपल्यात हवे होते, अशी इच्छाही आमिरने व्यक्त केली.

'लाहौर १९४७' चित्रपटाची स्टारकास्ट देखील अतिशय तगडी आहे. सनी देओलसोबत या चित्रपटात प्रदीर्घ काळानंतर प्रीती झिंटा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्यासोबतच शबाना आझमी आणि सनीचा मुलगा करण देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे संगीतकार ए.आर. रहमान आणि गीतकार जावेद अख्तर या जोडीची जादू अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकताच त्याचा 'बॉर्डर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली कमाई केली आहे. 'गदर २' च्या प्रचंड यशानंतर सनी देओल पुन्हा एकदा एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'लाहौर १९४७' हा चित्रपट फाळणीच्या काळातील एका संवेदनशील विषयावर आधारित असून, तो २०२६ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

Web Title : सनी देओल की 'लाहौर 1947' की रिलीज़ तारीख आमिर खान ने घोषित की

Web Summary : आमिर खान प्रोडक्शंस ने राजकुमार संतोषी द्वारा निर्देशित सनी देओल की 'लाहौर 1947' की रिलीज़ की तारीख 13 अगस्त, 2026 घोषित की। फिल्म में प्रीति जिंटा, शबाना आज़मी और करण देओल हैं, संगीत ए.आर. रहमान का है। यह फिल्म 1947 के विभाजन पर आधारित है।

Web Title : Sunny Deol's 'Lahore 1947' Release Date Announced by Aamir Khan

Web Summary : Aamir Khan Productions announced Sunny Deol's 'Lahore 1947,' directed by Rajkumar Santoshi, will release August 13, 2026. The film stars Preity Zinta, Shabana Azmi and Karan Deol, with music by A.R. Rahman. It is set against the backdrop of the 1947 partition.