'बॉर्डर २'च्या यशानंतर सनी देओलची ४ कोटीच्या लक्झरी कारमधून कच्छची सैर, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:15 IST2026-02-10T17:14:55+5:302026-02-10T17:15:58+5:30

सनी देओल एका खास रोड ट्रिपवर गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

Sunny Deol Kutch Road Trip Porsche Car Border 2 Box Office Hit | 'बॉर्डर २'च्या यशानंतर सनी देओलची ४ कोटीच्या लक्झरी कारमधून कच्छची सैर, पाहा व्हिडीओ

'बॉर्डर २'च्या यशानंतर सनी देओलची ४ कोटीच्या लक्झरी कारमधून कच्छची सैर, पाहा व्हिडीओ

लोकप्रिय अभिनेता सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. बहुचर्चित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. या प्रचंड यशानंतर सनी देओल आता 'रिलॅक्स' मूडमध्ये असून तो एका खास रोड ट्रिपवर गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

सनी देओलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आलिशान काळ्या रंगाच्या पोर्श कारमधून रोड ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने "रोड टू हेवन, कच्छ" असे कॅप्शन दिले आहे. सनीच्या या कारची किंमत ४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, 'बॉर्डर २' ने प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशीही आपली पकड मजबूत ठेवली आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ४५८.१६ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 'बॉर्डर २' हा २०२६ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी सनी देओलने तब्बल ५० कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा केला जात आहे, मात्र सनीने अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. 

Web Title : 'बॉर्डर 2' की सफलता के बाद सनी देओल की कच्छ यात्रा, लग्जरी कार में

Web Summary : 'बॉर्डर 2' की सफलता के बाद सनी देओल अपनी 4 करोड़ की पोर्श कार से कच्छ की यात्रा पर निकले। फिल्म ने भारत में 300 करोड़ और दुनिया भर में 458.16 करोड़ रुपये कमाए। देओल ने कथित तौर पर फिल्म के लिए 50 करोड़ रुपये लिए।

Web Title : Sunny Deol enjoys Kutch trip in luxurious car after 'Border 2' success.

Web Summary : After 'Border 2' success, Sunny Deol enjoys a road trip to Kutch in his luxurious ₹4 crore Porsche. The film grossed over ₹300 crore in India and ₹458.16 crore worldwide, becoming a 2026 blockbuster. Deol reportedly charged ₹50 crore for the role.