सनी देओलच्या 'जाट'मध्ये दिसणार एक नव्हे, दोन नव्हे तर सहा खलनायक; हे कलाकार साकारणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:54 IST2025-01-20T13:51:47+5:302025-01-20T13:54:26+5:30
सनी देओलच्या आगामी 'जाट' सहा अभिनेते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत (sunny deol, jaat)

सनी देओलच्या 'जाट'मध्ये दिसणार एक नव्हे, दोन नव्हे तर सहा खलनायक; हे कलाकार साकारणार भूमिका
सनी देओलने 'गदर २' सिनेमातून २०२३ साली बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये सनी देओल भलामोठा पंखा घेऊन गुंडांशी दोन हात करताना दिसतो. अशातच सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. 'जाट' सिनेमात सनी देओल एक नव्हे, दोन नव्हे तर सहा खलनायकांशी दोन हात करताना दिसणार आहे.
हे सहा खलनायक 'जाट'मध्ये दिसणार
सनी देओलच्या 'जाट' सिनेमात हे सहा खलनायक दिसणार आहेत.
- रणदीप हूडा: 'जाट' सिनेमातील प्रमुख खलनायक आहे रणदीप हूडा. 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्येच रणदीप हूडा काळ्या कपड्यात गळ्यात सोन्याची चैन परिधान करताना दिसून आला
- विनीत कुमार सिंह: याशिवाय 'जाट' सिनेमात 'रंगबाज' फेम लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विनीत कुमार सिंह खलनायक म्हणून झळकणार आहे. विनीत कुमार सिंह डोळे बंद करुन सनी देओलशी दोन हात करताना दिसणार आहे
- अजय घोष: तेलुगु आणि कन्नड सिनेमात काम करणारे अभिनेते अजय घोष 'जाट' सिनेमात खलनायक म्हणून समोर येणार आहेत. अजय घोष यांना खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
- दयानंद शेट्टी: CID या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता दयानंद शेट्टी सनी देओलच्या 'जाट'मध्ये खलनायक साकारणार आहे. २०२४ मध्ये गाजलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमात दयानंद दिसला होता.
- जगपति बाबू: साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि सुपरस्टार जगपति बाबू 'जाट' सिनेमात खलनायक साकारणार आहेत. जगपति बाबू गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड सिनेमांमध्येही पाहायला मिळत आहेत.
- बबलू पृथ्वीराज: रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमात बॉबी देओलच्या भावाची अर्थात असरार हकची भूमिका साकारणारा अभिनेता बबलू पृथ्वीराज 'जाट'मध्ये सनी देओलशी भिडताना दिसणार आहे.
अशाप्रकारेे सनी देओलच्या 'जाट' सिनेमात एक नव्हे, दोन नव्हे तर सहा खलनायक दिसणार आहेत. 'जाट' सिनेमा १० एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. सनी देओल ६७ व्या वर्षी अॅक्शन अवतारात दिसणार आहे.