धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:40 IST2025-12-08T11:40:18+5:302025-12-08T11:40:42+5:30
८ डिसेंबरला धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता. मात्र त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या वाढदिवशी अभिनेता सनी देओलने खास पोस्ट शेअर केली आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबरला निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय धर्मेंद्र यांच्या ९०व्या वाढदिवसाची तयारी करत होते. त्यांचा ९०वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणार होता. मात्र हे होऊ शकलं नाही. ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता. मात्र त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या वाढदिवशी अभिनेता सनी देओलने खास पोस्ट शेअर केली आहे.
सनी देओलने धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र फिरायला गेल्याचं दिसत आहे. सनी देओल त्यांना विचारतो "पापा मजा येतेय ना?". त्यावर धर्मेंद्र म्हणतात की "मी खरंच खूप एन्जॉय करतोय...हा नजारा खूपच छान आहे". हा व्हिडीओ शेअर करत सनी देओल धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसत आहे. "आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. ते नेहमी माझ्यासोबत आहेत...मिस यू", असं कॅप्शन सनी देओलने पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांना अभिनेत्याचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. म्हणूनच धर्मेंद्र यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच आज ८ डिसेंबर रोजी खंडाळा येथील फार्महाऊस चाहत्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अभिनेत्याला श्रद्धांजली देता येईल. 'हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांचं आवडतं ठिकाण होतं. ते अनेकदा तिथे कुटुंबासोबत वेळ घालवायते. फार्महाऊसवर धर्मेंद्र शेती करायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या आवडत्या ठिकाणी त्यांची पहिली जयंती करण्याचा निर्णय देओल कुटुंबाने घेतला.