धर्मेंद्र यांचा इंटिमेट सीन पाहून सनी देओलच्या तळपायाची आग गेली मस्तकात, दिग्दर्शकाची केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:05 IST2025-09-18T16:04:58+5:302025-09-18T16:05:38+5:30
धर्मेंद्र (Dharmendra) यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अनेक उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, एका सीनमुळे त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) इतका संतापला होता की त्याने थेट दिग्दर्शकालाच मारहाण केली होती.

धर्मेंद्र यांचा इंटिमेट सीन पाहून सनी देओलच्या तळपायाची आग गेली मस्तकात, दिग्दर्शकाची केली धुलाई
रोमँटिक आणि अॅक्शन हिरोंच्या यादीत धर्मेंद्र (Dharmendra) यांचं नाव नक्कीच घेतलं जातं. त्यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अनेक उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, एका सीनमुळे त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) इतका संतापला होता की त्याने थेट दिग्दर्शकालाच मारहाण केली होती.
तुम्हाला माहीत आहे का की, एकदा सनी देओलने त्याचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांचा एक इंटीमेट सीन दाखवल्यामुळे एका दिग्दर्शकाला खूप मारहाण केली होती? नुकतंच 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) यांनी याबद्दल सांगितलं आहे. अनुराग कश्यप यांचे भाऊ आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप सध्या खूप चर्चेत आहेत. एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'दबंग' अभिनेता सलमान खान आणि त्याचे भाऊ अरबाज खान-सोहेल खान यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांनी एका दुसऱ्या मुलाखतीत सनी देओलने एका दिग्दर्शकाला मारहाण केल्याबद्दलही सांगितलं आहे.
अभिनव कश्यप यांनी 'बॉलिवूड ठिकाणा'शी बोलताना खुलासा केला की, 'दबंग'मध्ये प्रजापती पांडेच्या भूमिकेसाठी ते सुरुवातीला विनोद खन्ना यांच्या आधी धर्मेंद्र यांना घेण्याचा विचार करत होते. पण ते घाबरले होते. यामागचं कारण होतं सनी देओल. कारण त्याने दिग्दर्शक कांती शाह यांना मारहाण केली होती. ते म्हणाले, "मी त्यांना भेटलो, त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, 'बेटा, मला फक्त अशीच भूमिका दे, जी महत्त्वाची असेल, अन्यथा नको देऊ.' त्या वेळी अशी चर्चा होती की, धर्मेंद्र यांना चुकीचा सीन करण्यास भाग पाडल्यामुळे सनी देओलने कांती शाह यांना मारहाण केली होती. त्यामुळे मला भीती वाटू लागली. मला कळत नव्हतं की ते मुख्य भूमिकेची अपेक्षा करत होते का?"
सनी देओलने कांती शाहला का मारहाण केली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धर्मेंद्र यांच्या फारसं काम नव्हतं, तेव्हा त्यांनी कांतीसोबत एका 'सी-ग्रेड' चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात कांती शाह यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'हार्ट अटॅक'चा सीन शूट केला होता, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो एक इंटीमेट सीन होता. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांनी असा कोणताही सीन शूट केला नव्हता. त्यांचा चेहरा मॉर्फ केला गेला होता. असं म्हणतात की, यामुळे संतप्त झालेल्या सनी देओलने कांती शाह यांना मारहाण केली होती.