सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर केला होता चाकूने हल्ला? धर्मेंद्र यांच्या पत्नीने मुलाखतीत याविषयी केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 21:00 IST1970-01-01T06:03:38+5:302018-10-31T21:00:00+5:30

सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर खरंच हल्ला केला होता का असा प्रश्न धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता.

Sunny Deol attacked Hema Malini with a knife attack? Disclosure was made about Dharmendra's wife in this interview | सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर केला होता चाकूने हल्ला? धर्मेंद्र यांच्या पत्नीने मुलाखतीत याविषयी केला होता खुलासा

सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर केला होता चाकूने हल्ला? धर्मेंद्र यांच्या पत्नीने मुलाखतीत याविषयी केला होता खुलासा

धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुले देखील होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी शोले, सीता गीता, राजा जानी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शोले या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तर त्यांच्या प्रेमकथेची मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. याच चित्रपटानंतर काहीच महिन्यात ते दोघे लग्नबंधनात अडकले. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला होता. आपल्या आईच्या बाबतीत अतिशय वाईट घडले असे सनी देओलला वाटत असल्याने त्याने हेमा मालिनी यांच्यावर हल्ला केला होता अशी चर्चा त्या काळात रंगली होती. पण या सगळ्यावर धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. 

सनी देओलने हेमा मालिनी यांच्यावर खरंच हल्ला केला होता का असा प्रश्न धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर हे सगळे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते की, आपले वडील हे केवळ आपल्या आईचेच असावेत असे प्रत्येक मुलाला वाटत असते. त्यामुळे सनीला असे वाटण्यामागे काहीही चुकीचे नव्हते. पण असे वाटल्यामुळे तो मुलगा त्या दुसऱ्या स्त्रीला मारून टाकेन असे होत नाही. माझ्या मुलांच्या नजरेत मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे. माझ्या मुलांसाठी मी सर्वस्वी असली तरी माझी मुले कोणालाही इजा करू शकत नाहीत.

धर्मेंद्र केवळ १९ वर्षांचे असताना त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांचे हे अरेंज्ड मॅरेज असून १९५४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांना सनी, बॉबी, विजेता आणि अजेता अशी मुले आहेत. विजेता आणि अजेता या दोघींना धर्मेंद्र यांनी नेहमीच मीडियापासून दूर ठेवले आहे तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना आहाना आणि ईशा अशा दोन मुली आहेत. 

Web Title: Sunny Deol attacked Hema Malini with a knife attack? Disclosure was made about Dharmendra's wife in this interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.