'बॉर्डर २'च्या सेटवरून समोर आला सनी देओल आणि वरुण धवनचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:20 IST2025-02-18T13:19:12+5:302025-02-18T13:20:47+5:30

Border Movie Sequel : तब्बल २९ वर्षांनंतर जेपी दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल चित्रपटगृहात दाखल होणार आहे. बॉर्डर २ची तयारी गेल्या वर्षीच सुरू झाली होती. कास्टिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी सीक्वलच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

Sunny Deol and Varun Dhawan's first photo from the sets of 'Border 2' surfaced | 'बॉर्डर २'च्या सेटवरून समोर आला सनी देओल आणि वरुण धवनचा पहिला फोटो

'बॉर्डर २'च्या सेटवरून समोर आला सनी देओल आणि वरुण धवनचा पहिला फोटो

२०२५ प्रमाणे २०२६ देखील चित्रपट रसिकांसाठी उत्कंठावर्धक असणार आहे. असेच काही सीक्वल चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत, ज्यांची प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. यापैकी एक म्हणजे बॉर्डर २ (Border 2). तब्बल २९ वर्षांनंतर जेपी दत्ता दिग्दर्शित बॉर्डर चित्रपटाचा सीक्वल चित्रपटगृहात दाखल होणार आहे. बॉर्डर २ची तयारी गेल्या वर्षीच सुरू झाली होती. कास्टिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी सीक्वलच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. मंगळवारी चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी बॉर्डर २ च्या सेटवरील पहिला फोटो शेअर केला आहे, जो काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉर्डर २चे कलाकार शूटिंगसाठी झाशीला पोहोचले आहेत. चित्रपटाच्या सेटवरील पहिला फोटोही समोर आला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी,टीसीरिजने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बॉर्डर २ च्या सेटवरील पहिला फोटो शेअर केला. फोटोत सनी देओल आणि वरुण धवन आर्मी टँकवर बसले आहेत आणि चित्रपटाची उर्वरित टीम त्यांच्यासोबत दिसत आहे. सनी आणि वरुणचा आर्मी लूक दिसत असला तरी त्यांनी कॅज्युअल आउटफिट्स घातले आहेत. सेटवरील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "कृती, वारसा आणि देशभक्ती. झाशीच्या छावणीमध्ये बॉर्डर २ च्या सेटवर सनी देओल, वरुण धवन, निर्माता भूषण कुमार, निधी दत्ता, सहनिर्माता शिवचन, बिनॉयगांधी आणि दिग्दर्शक अनुराग सिंग यांच्यासोबत शूटिंग करत आहे."


याशिवाय वरूण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सनी देओल आणि त्याचा फोटो शेअर केला आहे. यात ते दोघे आर्मी टॅंकवर बसलेले दिसत आहे. ते बॉर्डर २ सिनेमाची अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. फोटोसोबत वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले, "सनी दिवस. आमचे सर. बॉर्डर २, इंडियन आर्मी." त्या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. 


इतर कलाकार गायब
सनी आणि वरुण बॉर्डर २ च्या सेटवर दिसले होते, परंतु इतर दोन मुख्य कलाकार गायब होते. या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझही बटालियन सैनिकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, सेटवरून प्रसिद्ध झालेल्या फोटोत हे स्टार्स दिसले नाहीत. निर्मात्यांनी फोटो शेअर करताना दोघांनाही टॅग केले आहे.

Web Title: Sunny Deol and Varun Dhawan's first photo from the sets of 'Border 2' surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.