नव्या सुनबाईंचं देओल कुटुंबानं केलं जोरदार स्वागत, लग्नाचे फोटो शेअर करत सनी देओल म्हणाले- आज मला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:52 IST2023-06-19T14:40:30+5:302023-06-19T14:52:51+5:30
अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल मुंबईत मोठ्या शाही अंदाजात हा विवाह सोहळा पार पडला आहे.

नव्या सुनबाईंचं देओल कुटुंबानं केलं जोरदार स्वागत, लग्नाचे फोटो शेअर करत सनी देओल म्हणाले- आज मला...
अभिनेता सनी देओल यांचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) १८ जूनला लग्नबंधनात अडकला आहे. द्रिशा आचार्य सोबत त्याने साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. मुंबईत मोठ्या शाही अंदाजात हा विवाह सोहळा पार पडला आहे. प्री-वेडिंग फंक्शनपासून ते लग्नापर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता
देओल कुटुंबात नव्या सूनचे आगमन झालं आहे. नव्या सुनच्या स्वागतासाठी देओल कुटुंबानी कोणतीच कसर सोडलेली नाही. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी नव्या सूनबाईंना मुलगी मानत आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
लग्नानंतर सनी देओल यांनी लेकचे आणि सूनचे लग्नातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी या नव्या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सनी देओल यांनी लिहिले, 'आज मला एक सुंदर लेक मिळाली आहे... देवाची कृपा तुमच्या दोघांवर राहू देत...'
करण देओल काका बॉबी देओलच्या ही खूप क्लोज आहे. काका आणि पुतण्यामध्ये स्पेशल बॉन्डिंग आहे. बॉबी देओनेही करणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बॉबी सोबत त्याची पत्नी तान्या आणि मुलगासुद्धा दिसतोय.
हे फॅमिली फोटो शेअर करताना बॉबी देओलने द्रिशाचे स्वागत केलं आहे आणि दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉबीने लिहिले,आता कुटुंबात मुलगी आल्यामुळे खूप आनंद होतो आहे.... @drishaacharya आणि @imkarandeol देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देवो.
कोण आहे द्रिशा आचार्य?
सनी देओलची होणारी सून द्रिशा आचार्य फिल्म निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. तिचे आईवडील सुमित आचार्य आणि चिमू आचार्य दुबईत असतात. द्रिशा आपल्या आईसोबत 1998 मध्ये मुंबईत शिफ्ट झाली. ती मिडल ईस्टमध्ये एक टॉप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. आईसोबत ती नॅशनल प्रोग्रॅम मॅनेजर म्हणूनही काम करते.