Govinda and Sunita Ahuja : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीताने हात जोडून केली विनंती, म्हणाली - माझा चीची परत ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:01 IST2025-08-23T13:00:57+5:302025-08-23T13:01:27+5:30

Sunita Ahuja And Govinda : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या लेटेस्ट व्हिडीओत सुनीताने गोविंदावरील प्रेम व्यक्त केले आहे, या अफवा खोट्या असल्याचे म्हटले आहे आणि त्याला परत येण्यास सांगितले आहे.

Sunita Ahuja's Emotional Plea to Govinda Amid Divorce Rumors, She Said, Come Back | Govinda and Sunita Ahuja : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीताने हात जोडून केली विनंती, म्हणाली - माझा चीची परत ये...

Govinda and Sunita Ahuja : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीताने हात जोडून केली विनंती, म्हणाली - माझा चीची परत ये...

बॉलिवूड स्टार गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) घटस्फोट घेणार असल्याच्या अफवांनी पुन्हा जोर धरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीताने ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि सुनीताने अभिनेत्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. तसेच, जूनपासून त्यांना कोर्टाकडून समुपदेशन सत्रांमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते, परंतु जिथे सुनीता प्रत्येक वेळी पोहोचली, तिथे गोविंदा अनेकदा या सत्रांना गैरहजर राहिला.

या अफवांमुळे चाहतेही गोंधळले होते आणि सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने कथेत ट्विस्ट आणला आहे. या व्हिडीओमध्ये सुनीताने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णपणे दुर्लक्षित करत गोविंदासाठी असलेले तिच्या मनातील प्रेम व्यक्त केले. एका मुलाखतीत सुनीता म्हणाली, "गोविंदाला कधी भूक लागते, कधी त्यांना कोक हवे असते आणि कधी त्यांना ॲसिडिटी होते, हे मला माहीत आहे. माझ्यासारखे त्यांना कोणीही ओळखू शकत नाही, कारण मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. कोणी कितीही प्रेम केले तरी माझ्यासारखे गोविंदावर कोणीही प्रेम करू शकणार नाही."

सुनीताला आवडतो ९० च्या दशकातील गोविंदा 
सुनीताला जेव्हा विचारले की, त्यांना ९० च्या दशकातील गोविंदा जास्त आवडतो की २००० च्या दशकातील, तेव्हा तिने लगेच उत्तर दिले, "९० च्या दशकातीलच. मला जुना गोविंदाच सर्वात जास्त आवडतो." त्यानंतर तिने हात जोडून कॅमेऱ्यासमोर म्हटले, "परत ये गोविंदा तू यार, माझा चीची तू परत ये." याशिवाय सुनीताने कॅमेऱ्यावर आपली एंगेजमेंट रिंगही दाखवली आणि ब्रेकअपच्या बातम्यांना विनोदात उडवून लावले. हा व्हिडिओ १४ ऑगस्ट रोजी शूट झाला होता, कारण त्या दिवशी सुनीताने हेच कपडे घालून सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले होते. सुनीताच्या या व्हिडीओमुळे घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच अंशी शांत झाल्या आहेत. मात्र, अद्याप गोविंदा आणि सुनीताकडून या बातम्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Sunita Ahuja's Emotional Plea to Govinda Amid Divorce Rumors, She Said, Come Back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.