"मी संत नाही, माणूस आहे"; मद्यपानावरून ट्रोल करणाऱ्यांना गोविंदाच्या पत्नीनं झापलं; आवडता ब्रँडही सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:01 IST2026-05-08T11:58:10+5:302026-05-08T12:01:07+5:30

"मी कुणाच्या पैशांनी दारू पीत नाही..." ट्रोलर्सवर भडकली गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा

Sunita Ahuja Lashed Out On Being Asked About Drinking Alcohol Know What She Had Said | "मी संत नाही, माणूस आहे"; मद्यपानावरून ट्रोल करणाऱ्यांना गोविंदाच्या पत्नीनं झापलं; आवडता ब्रँडही सांगितला!

"मी संत नाही, माणूस आहे"; मद्यपानावरून ट्रोल करणाऱ्यांना गोविंदाच्या पत्नीनं झापलं; आवडता ब्रँडही सांगितला!

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीत तिनं आपल्या खाजगी आयुष्यातील सवयींवरून होणाऱ्या ट्रोलिंगला जोरदार प्रत्युत्तर दिले. "मी कुणाच्या वडिलांच्या पैशांनी दारू पीत नाही" अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.

अभिषेक व्यास यांच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा सुनीता आहुजाला दारू पिण्याच्या आवडीबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मी काही संत नाही. मला नवरा आहे, मुले आहेत आणि मी एक माणूस आहे. मी देवाची पूजा-अर्चा करते याचा अर्थ मी साधू झाले असा होत नाही. मी एक संतुलित जीवन जगते आणि मला जे आवडतं ते मी करते".


ट्रोलिंगवर ती म्हणाली, "लोक काय म्हणतात त्याने मला फरक पडत नाही. मला कोणी जेवायला घालत नाही किंवा कोणी प्यायला पैसे देत नाही.  मला आवडेल तसे जगते. डॉक्टरही म्हणतात की दोन पेग हृदयासाठी चांगले असतात".

'ब्लू लेबल' आहे आवडता ब्रँड!
सुनीता आहुजानं 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले की, 'ब्लू लेबल' (Blue Label) हा तिचा आवडता ब्रँड आहे. मुलाच्या वाढदिवशी किंवा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी आनंद साजरा करण्यासाठी मद्यपान करते, असेही तिनं नमूद केले.

Web Title : मैं संत नहीं, इंसान हूं: गोविंदा की पत्नी ने ट्रोलर्स को लताड़ा

Web Summary : गोविंदा की पत्नी सुनीता आहूजा ने ट्रोलर्स को जवाब देते हुए अपनी शराब पीने की आदतों का बचाव किया और कहा कि उन्हें अपनी मर्जी से जीने का हक है। उन्होंने कहा कि वह संत नहीं हैं और संतुलित जीवन जीती हैं। उन्होंने 'ब्लू लेबल' को अपना पसंदीदा ब्रांड बताया, जिसका सेवन वह उत्सवों के दौरान करती हैं।

Web Title : I'm Human, Not a Saint: Govinda’s Wife Slams Trollers

Web Summary : Sunita Ahuja, Govinda's wife, defended her drinking habits against trolls, asserting her right to live as she pleases. She stated she's not a saint and enjoys a balanced life, revealing Blue Label as her preferred brand, consumed during celebrations.