"प्रोटीन शेक पित नाही तर आईच्या हातचं.."; ६४ वर्षीय सुनील शेट्टीने उलगडलं फिटनेसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:32 IST2025-06-15T11:30:56+5:302025-06-15T11:32:03+5:30

सुनील शेट्टी वयाची ६० वर्ष ओलांडल्यावर फिटनेससाठी काय करतात, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. काय म्हणाले सुनील शेट्टी , जाणून घ्या

sunil shetty fitness mantra at the age of 64 not protein shake detail inside | "प्रोटीन शेक पित नाही तर आईच्या हातचं.."; ६४ वर्षीय सुनील शेट्टीने उलगडलं फिटनेसचं रहस्य

"प्रोटीन शेक पित नाही तर आईच्या हातचं.."; ६४ वर्षीय सुनील शेट्टीने उलगडलं फिटनेसचं रहस्य

सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते. सुनील यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सुनील आज ६४ वर्षांचे आहेत तरीही ते एकदम फिट अँड फाईन आहेत. सुनील शेट्टी यांचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. सुनील शेट्टी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या फिटनेसचं सीक्रेट सर्वांना सांगितलं आहे. ६४  व्या वर्षी सुनील शेट्टी फिट अँड फाइन कसे काय, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. काय म्हणाले सुनील शेट्टी?

सुनील शेट्टींनी सांगितला फिटनेस मंत्रा

अमर उजालाशी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाले, "मी आज ६४ वर्षांचा आहे. मी फिट राहण्यासाठी अगदी साध्या गोष्टी करतो. मी कधीही प्रोटीन शेक घेत नाही. आई जे जेवण बनवते त्या आहारातून मला आवश्यक त्या गोष्टी मिळतात. लोक जिम आणि प्रोटीन शेकबद्दल बोलतात, परंतु तंदुरुस्त राहण्यासाठी सातत्य आणि शिस्त महत्त्वाची आहे. सोमवार ते शनिवार व्यायाम आवश्यक आहे. पुरेशी झोप कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. संध्याकाळी ६:३० किंवा ७ वाजण्याच्या आधी रात्रीचं जेवण करणं महत्वाचं आहे. याशिवाय हंगामी फळे आणि भाज्या खा. मी कधीही प्रोटीन शेक घेत नाही. ते चांगले आहे की वाईट हे मला माहित नाही. आजारी असण्यापेक्षा निरोगी राहणे महत्वाचं आहे."

सुनील शेट्टीचे वर्कफ्रंट

सुनील शेट्टी सध्या विविध बॉलिवूड सिनेमांंच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुनील शेट्टी आगामी 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूटिंग करतोय. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमार, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याशिवाय सुनील शेट्टी, अक्षय कुमार यांचा 'हेरा फेरी ३' सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने आता या सिनेमात कोण काम करणार, हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे.

Web Title: sunil shetty fitness mantra at the age of 64 not protein shake detail inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.