कपिल देव यांच्यासारखा हुबेहूब अंदाज, सुनील ग्रोव्हरची मिमिक्री पाहून खळखळून हसला विराट कोहली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:11 IST2025-11-28T17:11:20+5:302025-11-28T17:11:45+5:30
सुनील ग्रोव्हरची ही मिमिक्री इतकी जबरदस्त होती की, खुद्द क्रिकेटपटू विराट कोहली हसून हसून लोटपोट झाला.

कपिल देव यांच्यासारखा हुबेहूब अंदाज, सुनील ग्रोव्हरची मिमिक्री पाहून खळखळून हसला विराट कोहली
सुनील ग्रोव्हर हा एक प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता आहे, जो 'गुत्थी', 'डॉ. गुलाटी' यांसारख्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याच्या विविध कामांतून तो लोकांना खळखळून हसवतो. उत्कृष्ट कॉमेडी आणि गंभीर अभिनय हेच नाही तर सुनील ग्रोव्हर त्याच्या मिमिक्रीच्या कलेसाठी लोकप्रिय आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यानं दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांची मिमिक्री केली. त्याची ही मिमिक्री इतकी जबरदस्त होती की, खुद्द क्रिकेटपटू विराट कोहली हसून हसून लोटपोट झाला.
सुनील ग्रोव्हर आणि विराट कोहली हे एशियन पेंट्सच्या एका खास कार्यक्रमात एकत्र स्टेजवर दिसले. या कार्यक्रमादरम्यान, सुनील ग्रोव्हरने त्याच्या अनोख्या कॉमिक टायमिंगने सर्वांना हसवले. वेगवेगळ्या पात्रांसाठी आणि मिमिक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीलनं थेट कपिल देव यांची नक्कल केली. सुनीलनं कपिल देव यांची बोलण्याची ढब आणि हावभाव अचूकपणे पकडत विराटचं कौतुक केलं. सुनील ग्रोव्हरची ही भन्नाट मिमिक्री पाहून विराट खळखळुन हसला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते सुनील ग्रोव्हरचं कौतुक करत आहेत.
सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर सक्रीय असून तो व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडीओ बऱ्याचदा चर्चेत येत असतात. सुनीलच्या साधेपणावर चाहते फिदा असतात. सुनील खऱ्या आयुष्यात प्रचंड साधा राहत असला तरीदेखील त्याची एकूण संपत्ती थक्क करणारी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये फी घेतो. त्यामुळे त्याचं एकूण नेटवर्थ १८ कोटी रुपये आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या सुनीलने कॉमेडी शो सोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.