‘धडकन 2’मध्ये कोण असतील स्टार्स? सुनील शेट्टीचे उत्तर ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 16:11 IST2020-04-20T16:09:28+5:302020-04-20T16:11:25+5:30
‘धडकन 2’ पुन्हा चर्चेत

‘धडकन 2’मध्ये कोण असतील स्टार्स? सुनील शेट्टीचे उत्तर ऐकून व्हाल हैराण
90 च्या दशकातील ‘धडकन’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचा हा सिनेमा रिलीज झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. अशात आजच्या रिमिक्स आणि रिमेकच्या काळात या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या सीक्वेलच्या चर्चा झाल्या नाही तर नवल. ‘धडकन’चा सीक्वल ‘धडकन 2’ येणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होतेय. पण प्रत्यक्षात ही चर्चा कधीच पुढे सरकली नाही. आता मात्र ‘धडकन 2’ पुन्हा चर्चेत आला आहे. कारण काय तर सुनील शेट्टीने याबद्दल एक हैराण करणारे उत्तर दिले आहे.
होय, अलीकडे ईटी टाइम्ससोबतच्या एका लाइव्ह चॅट सेशनमध्ये सुनील शेट्टीला ‘धडकन’च्या दुस-या पार्टबद्दल विचारण्यात आले. ‘धडकन’चा दुसरा पार्ट आलाच तर तुला यात कोणते स्टार्स बघायला आवडतील, असा प्रश्न त्याला केला गेला. या प्रश्नावर सुनील शेट्टीने असे काही उत्तर दिले की, सगळेच हैराण झालेत.
‘धडकन 2’ मध्ये धर्मेश दर्शन आणि व्हिनस माझा मुलगा अहान शेट्टी, अक्षय कुमारचा मुलगा आरव आणि शिल्पा शेट्टीची मुलगी समिशाला घेतील अशी मी आशा करतो. पण शिल्पाची मुलगी सध्या अगदीच लहान व गोड आहे. सीक्वलमध्ये अहानला हिरोईन मिळावी, अशीही माझी इच्छा आहे. कारण ‘धडकन’मध्ये शिल्पाने अक्षयसाठी मला सोडले होते, असे सुनील शेट्टी म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून अनेकांनी त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरची प्रशंसा केली़.
अक्षय कुमारसोबत पुन्हा काम करण्याची शक्यताही यावेळी त्याने बोलून दाखवली. अक्षय व सुनील दोघेही ‘हेराफेरी 3’ मध्ये एकत्र काम करणार आहेत. अर्थात अद्याप हा सिनेमा प्री-प्रॉडक्यन फेजमध्ये आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे काम सध्या थांबले आहे.