सुकेशने जॅकलीनला दिली धमकी? चॅट्स, स्क्रीनशॉट्स लीक करेन असा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 18:23 IST2023-12-22T18:22:55+5:302023-12-22T18:23:30+5:30
आतापर्यंत तुरुंगातून जॅकलीनला प्रेमपत्र पाठवणाऱ्या सुकेशने आता तिला थेट धमकीच दिली आहे

सुकेशने जॅकलीनला दिली धमकी? चॅट्स, स्क्रीनशॉट्स लीक करेन असा दिला इशारा
महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) आतापर्यंत तुरुंगातून जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) प्रेमपत्र पाठवत होता. पण आता सुकेशने जॅकलीनला थेट धमकीच दिली आहे. आपले सर्व स्क्रीनशॉट्स, चॅट्स, रेकॉर्डिंग्स उघड करण्याची त्याने धमकी दिली आहे. याचं कारण म्हणजे जॅकलीनने दोन दिवसांपूर्वी सुकेशला पत्र पाठवण्यापासून आणि ते माध्यमांमध्ये व्हायरल करण्यापासून रोखा अशी मागणी तिने कोर्टात केली होती.
माध्यम रिपोर्टनुसार, सुकेशने जॅकलीनचे नाव न घेता एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने लिहिले की तो एका व्यक्तीचं पितळ उघडं पाडणार आहे. तो त्या व्यक्तीचे चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि रेकॉर्डिंग्स रिलीज करणार आहे. सुकेशने दावा केला की त्याने या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटची रीच वाढवण्यासाठी पेसै भरले होते. जेणेकरुन या व्यक्तीला सोशल मीडियावर आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्त रीच मिळेल.
२०० कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणी सुकेश तुरुंगात आहे. त्याने पुढे चिठ्ठीत लिहिले,'जगासमोर खरं आणण्याची गरज आहे.' तर दुसरीकडे सुकेशच्या पत्रांना वैतागून जॅकलीनने दिल्ली पटियाला कोर्टात धाव घेतली आहे. या चिठ्ठ्यांमुळे तिच्या सामाजिक आणि प्रोफेशनल आयुष्यावरही परिणाम होत असल्याचं तिने म्हटलं आहे. तसंच ती याप्रकरणात साक्षीदार आहे त्यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो असं आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केलं आहे.