कन्नड अभिनेता संपत जे ची आत्महत्या, ३५ व्या वर्षीच संपवलं जीवन; 'वर्षभरापूर्वीच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:51 IST2023-04-24T09:50:36+5:302023-04-24T09:51:20+5:30

संपत जे गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्यात होते.

Suicide of Kannada actor Sampath J at the age of 35 due to depression | कन्नड अभिनेता संपत जे ची आत्महत्या, ३५ व्या वर्षीच संपवलं जीवन; 'वर्षभरापूर्वीच...'

कन्नड अभिनेता संपत जे ची आत्महत्या, ३५ व्या वर्षीच संपवलं जीवन; 'वर्षभरापूर्वीच...'

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी आली आहे. कन्नडचा लोकप्रिय स्टार संपत जे. (Sampat J) ने आत्महत्या केली आहे. केवळ ३५ व्या वर्षी त्याने हे पाऊल उचललं. २२ एप्रिल रोजी संपत ने नेलमंगला येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. कन्नड फिल्म इंडस्ट्री शोकाकूल झाली आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, संपत जे गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्यात होते. म्हणूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे. त्यांच्या निधनानंतर अनेक स्टार्सने शोक व्यक्त केला आहे. अग्निसाक्षी या टीव्ही शो मधील संपत चे कोस्टार विजय सूर्या म्हणाले,'गेल्या अनेक दिवसांपासून ते चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होते.'

वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

श्री बालाजी फोटो स्टुडिओ सारख्या सिनेमात काम करणारे संपत जे यांचं गेल्यावर्षीच लग्न झाले होतं. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अद्याप कुटुंबाची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Web Title: Suicide of Kannada actor Sampath J at the age of 35 due to depression