Suhana Khan Viral Video: एअरपोर्टवर सुहाना दिसली अन् मागे पडली मुलं...; पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 01:52 PM2022-11-17T13:52:25+5:302022-11-17T14:31:34+5:30

Suhana Khan Viral Video: सुहानाचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

suhana khan spotted at airport boys followed her watch viral video | Suhana Khan Viral Video: एअरपोर्टवर सुहाना दिसली अन् मागे पडली मुलं...; पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

Suhana Khan Viral Video: एअरपोर्टवर सुहाना दिसली अन् मागे पडली मुलं...; पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

Suhana Khan Viral Video: किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan ) लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. सुहानाचा पहिला सिनेमा रिलीज व्हायचाय, पण त्याआधी तिची जोरदार चर्चा आहे. या ना त्या कारणानं सुहाना सतत चर्चेत असते. नुकतंच सुहाना मुंबई एअरपोर्टवर दिसली. याठिकाणी सुहानासोबत असं काही घडलं की, सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली. सुहानाचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सुहाना एअरपोर्टबाहेर पडताना दिसतेय. बॅगी डेनिम आणि ग्रे कलरचा स्वेट शर्ट अशा कॅज्युअल लुकमध्ये सुहाना दिसतेय. तिने चेहऱ्यावर मास्क लावलेलं आहे. अशात तीन-चार मुलं तिला फॉलो करत आहेत. हे मुलं टवाळकी करत असताना अचानक सुहाना मागे वळून बघते आणि तिने मागे वळून बघताच ती मुलं लाजतातना दिसतात. 

सुहानाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहलं, ‘सुहानाच्या मागे येणारी मुलं तिला पाहून लाजत का आहेत?’, तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सुहानाने मागे वळून पाहिल्यानंतर मुलं लाजू लागली...’ काहींना सुहानाला अशाप्रकारे मुलांनी फॉलो केलेलं अजिबात आवडलं नाही. ही मुलं सेलिब्रिटीच्या मुलीसोबत असं वागत असतील तर रस्त्यावरच्या मुलींसोबत काय करतील? असा सवाल एका युजरने केला आहे.

सुहानाचा  ‘द आर्चीज’ सिनेमा लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात सुहाना शिवाय सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू  अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.   झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ सिनेमा  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: suhana khan spotted at airport boys followed her watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.