सुहाना खान वयाच्या २२ व्या वर्षीच बनली ब्रँड अँबेसिडर, नेटकरी म्हणाले, 'ही कोण आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:47 IST2023-04-12T12:46:14+5:302023-04-12T12:47:54+5:30

मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये सुहाना खानने हजेरी लावली.

Suhana Khan became a brand ambassador of international brand maybelline at the age of 22 netizens trolled her | सुहाना खान वयाच्या २२ व्या वर्षीच बनली ब्रँड अँबेसिडर, नेटकरी म्हणाले, 'ही कोण आहे...'

सुहाना खान वयाच्या २२ व्या वर्षीच बनली ब्रँड अँबेसिडर, नेटकरी म्हणाले, 'ही कोण आहे...'

सध्या सिनेसृष्टीत स्टारकिड्सची चलती आहे. त्यांना इंडस्ट्रीत लॉंच करण्यासाठी सेलिब्रिटी आईवडील धडपड करत आहेत. या स्टारकिड्समध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचं (Suhana Khan). सुहाना तिच्या बोल्डनेसने सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. लवकरच ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल. मात्र त्याआधीच ती एका नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँडची अॅंबेसिडर बनली आहे.

मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये सुहाना खानने हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये सुहानाच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. सुहाना न्यूयॉर्क बेस्ड Maybelline या ब्युटी ब्रँडची अॅंबेसिडर बनली आहे. वयाच्या केवळ 22 व्या वर्षीच तिने हे यश मिळवले आहे. या इव्हेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इव्हेंटवेळी ती म्हणाली, 'हॅलो, मी इथे येऊन खूपच उत्सुक आहे. खरंच मला खूप आनंद होतोय. या प्रोडक्टसाठी आम्ही केलेले शूट तुम्ही लवकरच पाहाल. ब्रँड अँबेसिडर होणे माझ्यासाठी सम्मानाची बाब आहे. या ब्रँडचा भाग झाल्याने मी खूप खूश आहे.'

सुहाना खान लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'आर्चीज' या फिल्ममधून अनेक स्टारकिड्स डेब्यू करत आहेत. फिल्मचे शूट पूर्ण झाले आहे. ही एक लाईव्ह अॅक्शन म्यूझिकल फिल्म असणार आहे. यामध्ये खूशी कपूर, अगस्त्य नंदा हे स्टारकिड्सही आहेत. 

Web Title: Suhana Khan became a brand ambassador of international brand maybelline at the age of 22 netizens trolled her