बापरे! दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांची सोनू निगमवर दगडफेक; गायकाने हातच जोडले, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:30 IST2025-03-25T13:30:23+5:302025-03-25T13:30:55+5:30

गायक सोनू निगमने अलीकडेच दिल्लीमध्ये जो कॉन्सर्ट केला त्यात हा प्रकार घडला. जाणून घ्या (sonu nigam)

stones thrown at singer Sonu Nigam concert in Delhi technological university video viral | बापरे! दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांची सोनू निगमवर दगडफेक; गायकाने हातच जोडले, म्हणाला-

बापरे! दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांची सोनू निगमवर दगडफेक; गायकाने हातच जोडले, म्हणाला-

सोनू निगम (sonu nigam) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक. सोनू निगमला आपण विविध सुपरहिट गाणी गाताना पाहिलंय. सोनू निगम जगभरात त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम करताना दिसतो. अशातच अशातच दिल्लीमधील सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सोनू निगमवर दगडफेक केली. इतकंच नव्हे तर प्लॅस्टिकच्या बातम्यांचा वर्षाव केला. काय झालं नेमकं?

सोनू निगमवर भर कॉन्सर्टमध्ये दगडफेक

सोनू निगमचा नुकतंच दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये (DTU) कॉन्सर्ट झाला. कॉलेजमधील 'इंजीफेस्ट २०२५'साठी सोनू निगमने खास परफॉर्मन्स दिला होता. परंतु चालू कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या चाहत्यांनी चांगलाच गोंधळ घेतला. त्यामुळे कॉन्सर्ट मध्येच थांबवण्यात आली. कॉन्सर्ट पाहायला आलेल्या एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने अतिउत्साहात रंगमंचावर दगडफेक केली आणि प्लॅस्टिकच्या बॉटलचा वर्षाव केला. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे गायक हतबल झाला.

मीडिया रिपोर्टनुसार DTU मध्ये दगडफेक झाल्याने सोनू निगमला चांगलाच त्रास झाला. त्याने उपस्थित प्रेक्षकांना असं करु नका, असं आवाहन केलं. DTU च्या रोहिणी कॅम्पसमधील प्रेक्षकांना सोनू निगमने शेवटी हात जोडून विनंती केली की, "तुमच्यासोबत चांगला वेळ घालवता यावा म्हणून मी इथे आलोय. तुम्ही कॉन्सर्टचा आनंद घेऊ नये, असं मी सांगितलेलं नाही. पण कृपया असं काही करु नका" दगडफेक झाल्याने सोनूच्या टीम मेंबर्समधील काही सदस्य जखमी झाल्याचं समजतंय.


Web Title: stones thrown at singer Sonu Nigam concert in Delhi technological university video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.