RRR 'आरआरआर'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! राजामौलींनी केली नवी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 17:32 IST2022-11-13T17:26:14+5:302022-11-13T17:32:23+5:30

सिनेमा दिग्दर्शक एस एस राजामौली यांची कोणतीही नवी घोषणा म्हणलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. राजामौली यांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघणे हा अद्भुत अनुभव असतो.

ss-rajamauli-says-rrr-2-is-in-making-dad-working-on-sequel's-script | RRR 'आरआरआर'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! राजामौलींनी केली नवी घोषणा

RRR 'आरआरआर'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! राजामौलींनी केली नवी घोषणा

RRR सिनेमा दिग्दर्शक एस एस राजामौली यांची कोणतीही नवी घोषणा म्हणलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. राजामौली यांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघणे हा अद्भुत अनुभव असतो. याच वर्षी रिलीज झालेल्या आरआरआर या सिनेमाने ते दाखवून दिले. आता आरआरआर फॅन्स साठी खुषखबर कारण आरआरआर च्या सीक्वेल वर काम सुरु झाले आहे.

आरआरआरने भारतात तर रेकॉर्डतोड कमाई केलीच. सध्या जपानमध्येही हा सिनेमा आपला डंका गाजवतोय. स्वत: दिग्दर्शक एस एस राजामौली, अभिनेता रामचरण, अभिनेता जुनियर एनटीआर यांनी जपानमध्ये सिनेमाचे प्रमोशन केले. 

आरआरआर पार्ट २ च्या स्क्रीप्टवर काम सुरु

जपानमध्ये प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत राजामौली यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. राजामौली म्हणाले, 'माझे वडील केवी विजेंद्र प्रसाद लेखक आहेत. तेच माझ्या प्रत्येक चित्रपटाची कथा लिहितात. आम्ही आरआरआर २ वर चर्चा केली आणि त्याच्या कहाणीवर काम सुरु केले आहे.'

हे ऐकून फॅन्स चांगलेच खुष झाले आहेत. पुन्हा एकदा रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या दिग्गज अभिनेत्यांना एकत्र पाहता येणार आहे. 

Web Title: ss-rajamauli-says-rrr-2-is-in-making-dad-working-on-sequel's-script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.