श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:47 IST2025-11-05T16:46:46+5:302025-11-05T16:47:24+5:30
'मॉम २'च्या शूटिंगला सुरुवात, कोण साकारतंय भूमिका?

श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'मॉम' हा शेवटचा सिनेमा ठरला होता. २०१७ साली हा सिनेमा आला होता. लेकीच्या सुरक्षेसाठी आणि तिला झालेल्या त्रासानंतर नराधमांचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या आईची ती कथा होती. हा क्राइम थ्रिलर सिनेमा होता. श्रीदेवीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. आता 'मॉम'चा सीक्वेल येत आहे. बोनी कपूर यांनी आधीच याची घोषणा केली होती. आता प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात झाली आहे. सिनेमाच्या सेटवरुन काही फोटो लीक झाले आहेत.
'मॉम २'मध्ये श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर झळकणार आहे. खुशी आज २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आता तिचा सेटवरुन फोटो समोर आला आहे. यामध्ये करिश्मा तन्नाही दिसत आहे जिने व्हाईट आऊटफिट परिधान केलं आहे. बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यातच 'मॉम २'चं शूट मुंबईत सुरु झालं आहे आणि १० दिवसांचं शूट पूर्णही झालं आहे. खुशीची सिनेमात महत्वाची भूमिका आहे. आईच्या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये काम करणं हा खुशीसाठी भावुक करणारा अनुभव आहे.

खुशी कपूरने 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर ती 'लव्हयापा' आणि 'नादनियां' या सिनेमांमध्ये दिसली. 'मॉम २' खुशीचा चौथा सिनेमा आहे. गिरीश कोहली सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. बोनी कपूर त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सिनेमाची पहिली झलक दाखवणार असल्याची शक्यता आहे.