जान्हवीनंतर खुशी कपूरही करणार ‘हे’ काम, लवकरच होणार औपचारिक घोषणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:09 IST2018-10-02T21:08:25+5:302018-10-02T21:09:45+5:30
जान्हवीची लहान बहीण खुशी ही सुद्धा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे.

जान्हवीनंतर खुशी कपूरही करणार ‘हे’ काम, लवकरच होणार औपचारिक घोषणा!!
करण जोहरच्या ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये धूम करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी हा चित्रपट अनेकार्थाने खास होता. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर प्रचंड गाजला. लोकांना जान्हवीचा हा डेब्यू सिनेमा चांगलाच भावला. यानंतर जान्हवीकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. आता तर जान्हवीची लहान बहीण खुशी ही सुद्धा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. होय, बोनी कपूर व श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी एकदम सज्ज आहे आणि सध्या आपल्या डेब्यूसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. परफेक्ट शेपसाठी सध्या खुशी कडक डाएटवर असल्याचे कळतेय. सोबतचं रोज दीड तास जिममध्ये घाम गाळतेय. खरे तर खुशीला लहानपणापासून सुपर मॉडेल बनायचे होते. पण मोठ्या बहिणीला पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिलेले यश बघून खुशीही अभिनेत्री बनू इच्छित आहे. जान्हवीला करण जोहरने लॉन्च केले होते. खुशीलाही करण जोहरचं लॉन्च करणार असे मानले जात आहे. शाहरूखचा मुलगा आर्यन खान आणि खूशी कपूर या दोघांना करण लॉन्च करणार असल्याची चर्चा गत काही महिन्यांपासून आहे. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण ही औपचारिक घोषणा लवकरचं होईल, असे सूत्रांकडून कळतेय.
अलीकडे एका ताज्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी खुशीच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. ‘चित्रपटात येण्यासाठी मी जान्हवीला प्रोत्साहित केले, असे मी म्हणणार नाही. पण हो, मी तिला स्वातंत्र्य जरूर दिले. तुला जे करायचे ते कर, हेच मी तिला सांगितले. शेवटी तिच्या इच्छेचा बळी घेणारा मी कोण? अर्जुनमध्ये अॅक्टिंगचे गुण आहेत, हे सलमानने सांगेपर्यंत मलाही ठाऊक नव्हते. पण त्याचे हे गुण समोर आल्यानंतर त्यालाही मी तेवढीच मोकळीक दिली. अंशुलाचे म्हणाल तर तिला शिक्षणात अधिक रस आहे. खुशी आधी मॉडेल बनू इच्छित होती. पण आता तिचा कल अभिनयाकडे दिसतोय. आता तिलाही अभिनय क्षेत्रात यायचे आहे’, असे बोनी कपूर म्हणाले होते.