​ श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर हिने घेतला मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 07:13 AM2018-03-14T07:13:54+5:302018-03-14T12:43:54+5:30

बॉलिवूड सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीकडेआहे. दोघीही सध्या दु:खात आहेत आणि हळूहळू ...

Sridevi's younger daughter, happily, Kapoor took a big decision !! | ​ श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर हिने घेतला मोठा निर्णय!!

​ श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर हिने घेतला मोठा निर्णय!!

googlenewsNext
लिवूड सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीकडेआहे. दोघीही सध्या दु:खात आहेत आणि हळूहळू या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताहेत. आईच्या निधनानंतर जान्हवी तिचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’च्या शूटींगवर परतली आहे तर खुशीनेही आपल्या पुढील आयुष्याचे प्लानिंग सुरु केले आहे.



होय, भविष्यात काय करायचे, याचा निर्णय खुशीने घेतला आहे. श्रीदेवीच्या या लहान मुलीला मॉडेलिंगमध्ये प्रचंड रस आहे आणि त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय खुशीने घेतल्याचे कळतेय. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, खुशीला इंटरनॅशनल मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे आहे. तूर्तास खुशी आपले शिक्षण पूर्ण करतेय. पण ते पूर्ण होताच खुशी मॉडेलिंगच्या ट्रेनिंगसाठी विदेशात जाऊ शकते. खरे तर खुशीसाठी मॉडेलिंगचे जग नवे नाही. यापूर्वी अनेकदा खुशीने मॉडेलिंग केले आहे. श्रीदेवीसोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुशी पोहोचली, तेव्हा  सगळ्यांच्या नजरा तिच्यावरचं खिळल्या होत्या. तिच्या या लुकचे सर्वाधिक कौतुक झाले होते. यादरम्यान खुशीने अतिशय सीजलिंग स्लीव्हलेस गाऊन परिधान केला होता. डिझाईनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला हा प्रिंटेड ड्रेस खुशीवर चांगलाच खुलला होता.



ALSO READ : आईच्या निधनाचे दु:ख गिळून कामावर परतली जान्हवी कपूर! पाहा, ‘धडक’च्या सेटवरचे फोटो!!

खुशी आई व बहिणीप्रमाणेच अतिशय स्टाईलिश आहे. त्यामुळे मॉडेलिंगच्या दुनियेत एकदम फिट बसणारी आहे. तेव्हा मॉडेलिंगच्या दुनियेत खुशी आईप्रमाणेच मोठे नाव कमवेल, अशी आशा करूयात. आज श्रीदेवी आपल्यात असत्या तर त्यांनीही खुशीला अशाच शुभेच्छा दिल्या असत्या.
गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.  हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवसांच्या चौकशीनंंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले होते. यानंतर २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sridevi's younger daughter, happily, Kapoor took a big decision !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.