परिणीतीच्या ओढणीवर लिहिलाय 'हा' खास शब्द; तुमच्या लक्षात नाही आलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:49 IST2023-09-25T12:45:36+5:302023-09-25T12:49:45+5:30
राघव आणि परिणीती यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

Raghav Chadha Parineeti Chopra Wedding
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. २४ सप्टेंबरला पारंपारिक पंजाबी पद्धतीने शाही थाटात हा विवाह सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये पार पडला. यात लक्ष वेधून घेतलं ते परिणीतीच्या चुनरीने (ओढणी). ज्यावर एक खास शब्द लिहिलेला होता. ज्यामुळे परिणीतीच्या लुकला आणखी शोभा आली होती.
परिणीती व राघव यांनी पेस्टल रंगाचे कपडे लग्नासाठी निवडले. परिणीतीने अगदी न्यूड मेकअप केला आहे. तसेच दागिनेही खूप कमी घातले आहेत. गळ्यात कपड्यांवरचं मॅचिंग चोकर, मांगटिका आणि नाजुक कानातले तिने घातले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या लुकसोबतच तिने डोक्यावर एक लांब ओढणी देखील घेतली होती. या ओढणीवर 'राघव' असं नाव लिहिलं होतं. तसेच ओढणीवरच्या कडेला गोल्डन वर्क केलेलं होतं.
मनीष मल्होत्राने परिणीती चोप्राचा संपूर्ण वेडिंग लूक डिझाइन केला होता. शिवाय, तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो उदयपूरलाही पोहोचला होता. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला सानिया मिर्झा, मधु चोप्रा, हरभजन सिंग, सीएम अरविंद केजरीवाल, पंजाबचे सीएम भगवंत मान यांच्यासह अनेक स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर परिणीती-राघव तीन ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडसेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.