'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 16:10 IST2023-10-18T16:01:58+5:302023-10-18T16:10:35+5:30

'गणपत' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर आता नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Special promo release of 'Ganpat'; Tiger Shroff seen in ultra pro action mode | 'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ

'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर आता नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 'ये सब जहां शुरू हुआ था, वहीं खत्म करते है' या टायगरच्या संवादाने धडाकेबाज प्रोमोची सुरुवात होते. प्रोमोमध्ये टायगर दमदार स्टंट करताना दिसत आहे. तर जबरदस्त डॉयलॉगही ऐकायला मिळत आहेत. टायगर श्रॉफच्या सिक्स पॅक बॉडीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

टायगर श्रॉफला बॉलिवूडचा ॲक्शन हिरो म्हटले जाते. तो अनेकदा त्याच्या ॲक्शनआणि दमदार स्टंटमुळे चर्चेत असतो. शिवाय, गणपतमध्ये सुप्रसिद्ध अ‍ॅक्शन दिग्दर्शक टिम मैन यांचा सहभाग आहे. 'लिगेसी ऑफ लाईज', 'ट्रिपल थ्रेट' आणि 'एक्सिडेंट मॅन' यांसारख्या ब्लॉकबस्टरसाठी ते ओळखले जातात. 

गणपत हा बिग बजेट सिनेमा आहे.  हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांत २० ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टायगरशिवाय या चित्रपटात क्रिती सनॉन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. 'गणपत'मध्ये क्रिती पहिल्यांदाच ॲक्शन करताना दिसणार आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी गणपत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 

Web Title: Special promo release of 'Ganpat'; Tiger Shroff seen in ultra pro action mode