Sonam Kapoor : सोनम कपूरच्या आयुष्यात स्पेशल एंट्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 10:51 IST2021-09-26T10:51:04+5:302021-09-26T10:51:27+5:30

सोनम कपूरची Instagram Post आहे चर्चेत.

Special entry in bollywood actress Sonam Kapoorslife pdc | Sonam Kapoor : सोनम कपूरच्या आयुष्यात स्पेशल एंट्री ?

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या आयुष्यात स्पेशल एंट्री ?

ठळक मुद्देसोनम कपूरची Instagram Post आहे चर्चेत.

अभिनेत्री सोनम कपूरसोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच लंडनहून भारतात परतलेली अनिल कपूरची ही कन्या चर्चेत आहे. आपल्या आयुष्यात कोणा खासची एन्ट्री झाल्याचं तिनं म्हटलं आहे. तिने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर हसरा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सोनमने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ‘कोणीतरी खूप खास आहे. ज्याने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. ती जाणीव खूपच खास आहे. मी तुम्हाला त्याचा परिचय करून देण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. लवकरच त्याला भेटण्यासाठी तयार व्हा’, असं म्हणत सोनमने पोस्ट केली आहे.


सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. शिवाय संमिश्र प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकांनी सोनम प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Special entry in bollywood actress Sonam Kapoorslife pdc