साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:34 IST2022-05-07T18:17:57+5:302022-05-07T18:34:23+5:30
Actress Sai Pallavi : साउथ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, असे समजते आहे.

साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा?
साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तमीळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने कमी कालावधीत मारी २, प्रेमम आणि लव्ह स्टोरी सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. साई पल्लवी लवकरच राणा दुग्गाबतीसोबत वीरता पर्वममध्ये झळकणार आहे. तिची लोकप्रियता खूप आहे. दरम्यान साई पल्लवी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे समजते आहे.
अभिनेत्री साई पल्लवी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री साई पल्लवीच्या लग्नासाठी तिच्या पालकांनी तयारी केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या पालकांनी परफेक्ट वराचा शोध सुरू केला आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट वीरता पर्वम प्रदर्शित झाल्यानंतरच तिचे हात पिवळे होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप साई पल्लवीने दुजोरा दिलेला नाही.
अभिनेत्री साई पल्लवी ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ती सिनेइंडस्ट्रीच आली. जिथे या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. साई पल्लवी तिच्या साध्या लुक आणि दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य करते आहे. तसेच ती अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.