कॉर्न विक्रेत्यांपासून ते चहाच्या स्टॉलपर्यंत, लहान व्यावसायिकांसाठी सोनू सूदचा पुढाकार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:13 PM2023-07-06T15:13:36+5:302023-07-06T15:14:18+5:30

स्थानिक विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी सोनू सूद सोशल मीडिया वरून त्यांना प्रमोट करत आहे. 

sonu sood supports small business shares video from different smalle vendors to promote them | कॉर्न विक्रेत्यांपासून ते चहाच्या स्टॉलपर्यंत, लहान व्यावसायिकांसाठी सोनू सूदचा पुढाकार; Video व्हायरल

कॉर्न विक्रेत्यांपासून ते चहाच्या स्टॉलपर्यंत, लहान व्यावसायिकांसाठी सोनू सूदचा पुढाकार; Video व्हायरल

googlenewsNext

प्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवकसोनू सूद हा देशभरातील स्थानिक विक्रेते आणि लहान व्यवसायांसाठी आशेचा किरण ठरतो आहे. सोनू सूदच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून तो स्थानिक उद्योजकांना सशक्त बनवण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसतोय. सामान्य माणसाचा खरा 'मसीहा' म्हणून त्याची भूमिका या सगळ्या मुळे पुन्हा एकदा मजबूत झाली आहे. हॅशटॅग सपोर्ट स्मॉल बिझनेस अंतर्गत तो छोट्या छोट्या विक्रेत्यांना भेट देत त्यांचं प्रोत्साहन वाढवतोय.

स्थानिक विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी सोनू सूद सोशल मीडिया वरून त्यांना प्रमोट करत आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना खास प्रोत्साहन सुद्धा देत  आहे. मग तो हिमाचल प्रदेशातील कॉर्न विक्रेता असो किंवा बिहारमधील स्ट्रॉबेरी विक्रेता असो किंवा सोनू नावाचा स्थानिक चहा विक्रेता असो तो त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देताना दिसतोय. हृदयस्पर्शी इंस्टाग्राम रील्सद्वारे सूद या विक्रेत्यांना केवळ एक्सपोजरच देत नाही तर त्यांच्या स्थानिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित देखील करतो. 

अभिनयाव्यतिरिक्त सोनू समाजोपयोगी पुढाकार घेत आहे याचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. त्याच्या या व्हिडिओंमधून हेच लक्षात येतं. सोनूचं समाजकार्य पाहता साऊथमध्ये त्याचं मंदिरही बांधण्यात आलंय. अनेकांच्या आयुष्यात सोनू देवदूतच होऊन आला आहे.

Web Title: sonu sood supports small business shares video from different smalle vendors to promote them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.