Sonu sood: सोनू सूद महाकाल मंदिरात, पत्नीसोबत केली विधीव्रत पूजा; चाहत्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 14:55 IST2022-12-24T14:52:04+5:302022-12-24T14:55:54+5:30

सोनू सूद आपल्या पत्नीसह इंदौर येथून शुक्रवारी उज्जैनला पोहोचला. पत्नीसमेवत मंदिरात भगवान महाकाल यांची विधिव्रत पूजाही केली.

Sonu sood: Sonu Sood at Mahakal temple, performed vidhivrat pooja with wife, crowd of fans | Sonu sood: सोनू सूद महाकाल मंदिरात, पत्नीसोबत केली विधीव्रत पूजा; चाहत्यांची गर्दी

Sonu sood: सोनू सूद महाकाल मंदिरात, पत्नीसोबत केली विधीव्रत पूजा; चाहत्यांची गर्दी

कोरोना लॉकडाऊनमधील मसीहा आणि बॉलिवूड अभिनेता सोन सूद सध्या कुटुंबीयांसमवेत उज्जैन दौऱ्यावर आहे. कोरोना काळातील सोनू सूदच्या कामाची मोठी प्रशंसा झाली. सोनूने गोरगरीब आणि असहाय्य नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात मोठी मदत केली. एवढेच काय विदेशात अनेक नागरिकांना विमान प्रवासातून त्यांच्या घरी पोहोचवले. त्यामुळे, सोनू सूदची वेगळीच क्रेझ समाजात निर्माण झाली आहे. अभिनेता सोनू सूद यापेक्षा गोरगरिबांच मसीहा म्हणून त्याला भेटायला, पाहायला चाहते गर्दी करतात. सोनूने उज्जैनच्या महाकाल मंदिरात देवाचे दर्शन घेतले. सोनूचे मंदिरातील हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सोनू सूद आपल्या पत्नीसह इंदौर येथून शुक्रवारी उज्जैनला पोहोचला. पत्नीसमेवत मंदिरात भगवान महाकाल यांची विधिव्रत पूजाही केली. कपाळी चंदन टीळा लावून सोनू सूद पिवळ्या आणि भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करुन महाकाल पूजा करत आहे. तर, त्याची पत्नी रॉयल ब्लू कलरच्या साडीत मंदिरात महाकालसमोर हात जोडून दर्शन घेताना दिसत आहे. मंदिरात पुजारी सोनू सूदला विधीव्रत पूजेची माहिती देताना दिसून येतात. 

सोनू सूद येण्यापूर्वीच मंदिर समितीने पूजेची तयारी केली होती, त्यामुळे पत्नीसह सोनूने विधीव्रत पूजा करत महाकाल आणि तेथील पंडितांचे दर्शन घेतले. यावेळी, सोनू सूदला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. सोनू आणि त्याच्या पत्नीसोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांना दूर ठेवले. आता, या उज्जैन महाकाल पूजा-आरतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. 
 

Web Title: Sonu sood: Sonu Sood at Mahakal temple, performed vidhivrat pooja with wife, crowd of fans