कॉन्सर्टमध्येच उठून जाणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमचा सल्ला, म्हणाला, "तुम्ही येऊच नका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:34 IST2024-12-10T12:33:58+5:302024-12-10T12:34:37+5:30

जयपूरमधील कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्पष्टच बोलला

Sonu Nigam s advice to politicians who leave in the middle of the concert says dont come and sit | कॉन्सर्टमध्येच उठून जाणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमचा सल्ला, म्हणाला, "तुम्ही येऊच नका..."

कॉन्सर्टमध्येच उठून जाणाऱ्या राजकारण्यांना सोनू निगमचा सल्ला, म्हणाला, "तुम्ही येऊच नका..."

भारतातील अनेक दिग्गज गायकांपैकी एक म्हणजे सोनू निगम Sonu Nigam) . त्याचा  आवाज सर्वांनाच मंत्रमुग्ध करतो. 'संदेसे से आते है' ते 'अभी मुझ मे कही' सारखी अनेक सुपरहिट गाणी गायली. सोनू निगम अगदी ठरवूनही बेसुरा गाणार नाही इतकी त्याची सुरांवर पकड आहे. नुकतंच राजस्थानमध्ये सोनूची कॉन्सर्ट झाली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री कॉन्सर्ट सुरु असताना मध्येच उठून निघून गेले. यावर कॉन्सर्ट संपल्यानंतर सोनूने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत राजकारण्यांना सुनावलं आहे.

सोनू निगमने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटले, "नुकतीच जयपूरमध्ये एक कॉन्सर्ट झाली. 'रायझिंग राजस्थान' खूप छान शो झाला. चांगले चांगले रसिक आले होते. प्रतिष्ठित शो होता. जगभरातील लोक राजस्थानची शान वाढवण्यासाठी आले होते. मुख्यमंत्रीही होते, इतरही काही मंत्री होते. शोच्या मध्यातच सीएम साहेब आणि बाकी नेते उठून गेले. त्यामुळे  माझं सर्व राजकारण्यांना एकच आवाहन आहे जर तुम्हीच तुमच्या कलाकाराचा आदर करणार नाही तर मग बाहेरचे लोक तरी का करतील? ते काय विचार करतील? अमेरिकेत कोणी परफॉर्म करतोय आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष उठून जातील असं तर मी कधीच पाहिलं नाही. सांगून जातील किंवा थांबतील."

तो पुढे म्हणाला, "माझं तुम्हाला निवेदन आहे की जर तुम्हाला जायचंच असेल ना तर तुम्ही येऊच नका. किंवा शो सुरु होण्यापूर्वीच निघून जा. कोणत्याही कलाकाराच्या परफॉर्मन्स वेळी उठून निघून जाणं हे योग्य नाही. सरस्वती मातेचा हा अपमान आहे. कारण हे माझ्या लक्षात आलं नव्हतंच पण जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा मला अनेक मेसेज आले की तुम्ही असे राजकारण्यांसाठी परफॉर्मन्स करत जाऊ नका. जे जातात त्यांना कलेचा आदर नसतो. माझी विनंती आहे की जर तुम्हाला जायचंच असेल तर परफॉर्मन्स आधीच जा. बसूच नका. मला ठाऊक आहे तुम्ही व्यस्त असता. तुमच्याकडे अनेक काम असतात, जबाबदारी असते. त्यामुळे शो मध्ये बसून तुम्ही वेळ वाया घालवू का हे मी अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो."


सोनू निगमच्या या व्हिडिओ वर अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शवली आहे. 'तुम्ही हे निदर्शनास आणून दिलं यासाठी धन्यवाद', 'अखेर कोणीतरी बोललंच', 'हे तूच बोलू शकतोस' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. 

Web Title: Sonu Nigam s advice to politicians who leave in the middle of the concert says dont come and sit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.