स्कॉटलँडमध्ये सोनम कपूर करतेय 'या' चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 18:18 IST2020-12-30T18:18:10+5:302020-12-30T18:18:43+5:30
अभिनेत्री सोनम कपूर सध्या स्कॉटलँडमध्ये आहे.

स्कॉटलँडमध्ये सोनम कपूर करतेय 'या' चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या स्कॉटलँडमध्ये आहे. तिथे ती तिच्या आगामी चित्रपट 'ब्लाइंड'च्या शूटिंगसाठी तिथे गेली आहे. या चित्रपटाचे शूटिंग ग्लासगो येथे करण्यात येत आहे. शोम मखीजा दिग्दर्शित या चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे मुख्य भूमिका साकारत आहेत.
सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर 'ब्लाइंड'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखविण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे दिसणार आहेत.
'ब्लाइंड' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष, अविशेक घोष यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनमचा हा चित्रपट प्रसिद्ध कोरियन 'ब्लाइंड'चा हिंदी रिमेक आहे.
या चित्रपटाचा तमिळ रीमेक देखील तयार करण्यात आला होता. ज्याचे नाव 'नेत्रीकन' असे होते. या चित्रपटात दक्षिण अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत झळकली होती.
सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर नुकतीच ती एके वर्सेस एके चित्रपटात झळकली. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत होते.
अनुराग कश्यप या चित्रपटात सोनम कपूरला किडनॅप करताना दिसला. या चित्रपटाच्या आधी सोनम कपूर द जोया फॅक्टरमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान दलकीर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही.