सोनम कपूरच्या नवऱ्याला झालाय दुर्मिळ आजार; आनंदच्या आजाराचं डॉक्टरांनाही होत नव्हतं निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:22 IST2024-01-03T14:21:24+5:302024-01-03T14:22:07+5:30

Sonam kapoor: जवळपास ३ महिने अत्यंत त्रासदायक गेल्याचं सोनमने म्हटलं आहे.

sonam-kapoor-on-husband-anand-ahujas-illness-which-no-doctor-could-diagnose | सोनम कपूरच्या नवऱ्याला झालाय दुर्मिळ आजार; आनंदच्या आजाराचं डॉक्टरांनाही होत नव्हतं निदान

सोनम कपूरच्या नवऱ्याला झालाय दुर्मिळ आजार; आनंदच्या आजाराचं डॉक्टरांनाही होत नव्हतं निदान

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर (sonam kapoor) कायमच तिच्या हटके फॅशनसेन्समुळे चर्चेत येत असते. कोणतीही फॅशन ती बिनधास्तपणे कॅरी करते. गेल्या काही काळात सोनम कपूरचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. ती सध्या तिच्या लाडक्या लेकाला वायूला जास्तीत जास्त वेळ देत आहे. मात्र, या काळात ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्याही संपर्कात राहत आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या नवऱ्याविषयी एक मोठा खुलासा केला.

सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आनंदच्या आजारपणाविषयी भाष्य केलं आहे.
काय आहे सोनमची पोस्ट?

 “मागील वर्ष माझ्यासाठी रोलर कोस्टरसारखं होतं. आम्ही या गोष्टीचा स्वीकार केलाय की आम्ही पालक आहोत. आणि, या काळात अनेक आनंददायक गोष्टींसोबतच काही भितीदायक गोष्टीही सोबत येतात. मला जाणवलं की मी भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप बदलले आहे. हे सगळं वेदना सहन केल्यामुळे आणि आनंदी राहण्याच्या सवयीमुळे शक्य झालं आहे,” असं सोनम म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या नवऱ्याला एक दुर्मिळ आजार झालाय. पण, त्याला नेमकं काय झालंय हे डॉक्टरांनाही कळत नव्हतं. पण, नंतर त्या आजाराची माहिती मिळाली आणि अखेर आनंद बरा झाला. ते तीन महिने माझ्यासाठी नरकासारखे होते. डॉ. सरीन आणि देवाचे मी मनापासून आभार मानते. सध्या मी त्याच्या कामात त्याला साथ देत पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवण्यासोबतच हे वर्ष फार कठीण, समृद्धीचं आणि चांगलं होतं. आशा आहे येणारं वर्षही चांगलं आणि चढउतार असलेलं असेल ज्यातून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील."

दरम्यान, सोनमने उद्योगपती आनंद आहुजा याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सोनम प्रमाणेच आनंद सुद्धा सोशल मीडियावर सक्रीय आहे.

Web Title: sonam-kapoor-on-husband-anand-ahujas-illness-which-no-doctor-could-diagnose