Sonam Kapoor Pregnancy: सोनम कपूर 'गुड न्यूज' केव्हा देणार? तिनंच 'हिंट' दिली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 19:02 IST2022-03-21T18:45:48+5:302022-03-21T19:02:27+5:30
सोनमच्या प्रेग्नन्सीबाबत तर चाहत्यांना कळालच असेल पण तिचं बाळं या जगात केव्हा येणार आहे याबाबतही सोनमनं त्याच इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिलीय.

Sonam Kapoor Pregnancy: सोनम कपूर 'गुड न्यूज' केव्हा देणार? तिनंच 'हिंट' दिली, म्हणाली...
बॉलीवुडची बबली गर्ल सोनम कपूरने तिच्या प्रेग्नंसीची माहिती इन्स्टाग्राम पोस्टद्वारे देताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलीवुडच्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनीही सोनमला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. सोनमच्या या प्रेग्नन्सीमुळे सोनम सध्या बॉलीवुड नगरीत सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलीय. सोनमच्या प्रेग्नन्सीबाबत तर चाहत्यांना कळालच असेल पण तिचं बाळं या जगात केव्हा येणार आहे याबाबतही सोनमनं त्याच इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिलीय.
बेबी बम्प फ्लाँट करत ब्लॅक मोनोकिनीमध्ये पती आनंद अहुजाच्या पायांवर सोनम विसावली आहे. हाच फोटो चाहत्यांना शेअर करत सोनमने ही गुड न्यूज दिली आहे. या फोटोखाली सोनमने अगदी सुंदर कॅप्शन दिली आहे. ती म्हणते, ‘चार हात, जे तुझी जमेल तितकी काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या सोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला प्रेम आणि पाठींबा देईल. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.’
सोबत सोनमनं हॅशटॅग शेअर केले आहेत. ते म्हणजे #everydayphenomenal #comingthisfall2022
याचाच अर्थ सोनम या वर्षीच्या फॉल सिझन म्हणजेच भारतात सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. टाईम्स नॉव या वेबसाईटच्या हवाल्यानं ही बातमी आम्ही देत आहोत. मग तुम्हीही वाट बघताय ना सोनमच्या बाळाच्या आगमनाची?