सोनम कपूरनं दिला बाळाला जन्म?, रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:18 IST2022-07-11T16:17:37+5:302022-07-11T16:18:10+5:30
Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक फोटो सोशल मीडियावरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका बाळासोबत दिसत आहे.

सोनम कपूरनं दिला बाळाला जन्म?, रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यास उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आता सोनम कपूरचा एक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनमने एका मुलाला जन्म दिला असून आई-मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोनम तिच्या बाळाला छातीशी धरून बसलेली दिसत आहे. या फोटोने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही वेळातच न पाहिलेले फोटो इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
सोनम कपूरचा व्हायरल होत असलेला हा फोटो खोटा आहे. खरेतर अद्याप अभिनेत्रीनं अजून बाळाला जन्म दिलेला नाही. फोटोत सोनमचे चित्र मॉर्फ करून दुसरे चित्र लावले आहे. हा फोटो इंटरनेटवर एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे या वृत्तात अजिबात तथ्य नाही.
सोनम आणि आनंद यांनी मार्च २०२२ मध्ये आई-वडील होण्याची घोषणा केली. तेव्हापासून सोनमच्या प्रेग्नेंसीचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ८ मे २०१८ रोजी सोनम आणि आनंदचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न झाले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूर येत्या काही दिवसांत 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनम कपूरशिवाय पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झालेल्या याच नावाच्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.