काय हा प्रकार? रस्त्यावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली सोनम कपूर, नेटकऱ्यांच्या संतप्त कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:29 IST2026-02-02T16:28:38+5:302026-02-02T16:29:50+5:30

बेबी बंप कव्हर न करताना अशीच फिरत होती सोनम, नेटकरी म्हणातात..

sonam kapoor flaunting baby bump on mumbai roads netizens furious after seeing her fashion | काय हा प्रकार? रस्त्यावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली सोनम कपूर, नेटकऱ्यांच्या संतप्त कमेंट्स

काय हा प्रकार? रस्त्यावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली सोनम कपूर, नेटकऱ्यांच्या संतप्त कमेंट्स

अभिनेत्री सोनम कपूर बीटाऊनची फॅशन आयकॉन आहे. अनेक वर्ष ती सिनेमांपासून दूर असली तरी तिचं अस्तित्व कायम आहे. तिची स्टाईल, फॅशन सेन्स कमाल  आहे. सोनम दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत प्रेग्नंसीची घोषणा केली. तर आता नुकतंच ती मुंबईतील रस्त्यावर व्हाईट आऊटफिटमध्ये फिरताना दिसली. यावेळी तिने बेबी बंप कव्हर केला नसल्याने नेटकऱ्यांना तिचा लूक अजिबातच रुचला नाही. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोनम कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नंसीतही फॅशनबाबतीत अप टू डेट असते. नुकतीच ती व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली. व्हाईट शर्ट, व्हाईट स्कर्ट, मॅचिंग इअररिंग्स असा तिचा स्टायलिश लूक आहे मात्र सोनमने शर्टची मधली बटणं खुलीच ठेवली आहे. यामुळे तिचा बेबी बंप रिव्हील झाला आहे. अशाच लूकमध्ये ती रस्त्यावर फिरत आहे. 


हे पाहून नेटकरीही चक्रावले आहेत. फॅशनने किती खालची पातळी गाठली आहे अशी प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. 'rip फॅशन', 'किती फालतुपणा दिसतोय', 'विचित्र', 'सगळं कव्हर केलं पण बेबी बंप नाही, का? तू प्रेग्नंट आहेस माहितीये ते असं रिव्हील करण्याची गरज नाही', 'काय हा प्रकार हेच राहिलं होतं फॅशनमध्ये' अशा संतप्त कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

सोनम कपूरने २०२२ साली पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव वायू आहे. तर आता वयाच्या ४० व्या वर्षी सोनम दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे.  या बातमीने कपूर आणि आहुजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे आपल्या विचित्र फॅशनमुळे सोनम ट्रोलही होत आहे. 

Web Title : सोनम कपूर ने बेबी बंप दिखाया; रिवीलिंग आउटफिट पर नेटिज़न्स की प्रतिक्रिया।

Web Summary : दूसरी बार गर्भवती सोनम कपूर को मुंबई में सफेद पोशाक में देखा गया, जिसमें उनका बेबी बंप दिख रहा था। इस लुक ने नेटिज़न्स की तीखी प्रतिक्रियाओं को जन्म दिया, जिन्होंने उनकी फैशन पसंद को विचित्र और अनावश्यक बताया।

Web Title : Sonam Kapoor flaunts baby bump; netizens react to revealing outfit.

Web Summary : Sonam Kapoor, pregnant for the second time, was spotted in Mumbai wearing a white outfit with her baby bump exposed. This look triggered angry reactions from netizens who criticized her fashion choice as bizarre and unnecessary.