Sonam Kapoor Baby: अनिल कपूर झाले 'आजोबा'; सोनम-आनंदच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 16:56 IST2022-08-20T16:11:44+5:302022-08-20T16:56:47+5:30
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja)यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

Sonam Kapoor Baby: अनिल कपूर झाले 'आजोबा'; सोनम-आनंदच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja)यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शनिवारी दुपारी सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ती अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या वतीने आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.
नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. सोनम आणि आनंद.