मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात झळकणार, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:49 AM2023-04-10T11:49:36+5:302023-04-10T11:52:09+5:30

मल्याळम सिनेसृष्टीतील 'या' सुपरस्टारसोबत सोनाली दिसणार आहे.

sonali kulkarni marathi actress dubut in south movies malyalam cinema with mohanlal | मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात झळकणार, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात झळकणार, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) तिच्या अभिनयानं सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता सोनालीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्ही म्हणाल सोनाली बॉलिवूडमध्ये जाणार असेल पण नाही सोनाली हिंदी नाही तर थेट दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करत आहे. नुकतेच तिच्या दाक्षिणात्य सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

सध्या बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला अधिक आहे. त्यातच मराठमोळ्या सोनालीची दाक्षिणात्य सिनेमात वर्णी लागल्याने हे नक्कीच अभिमानास्पद आहे. 'मलाइकोकटाई वालीबन' या मल्याळी चित्रपटात सोनालीची भूमिका असणार आहे. यामध्ये ती सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत झळकणार आहे. 14 एप्रिल रोजी सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित होईल. 

पोस्टरवर डोंगर दऱ्या आणि मोठे पावलांचे ठसे दिसून येत आहेत. पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक लिजो जोस पेल्लीसरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.सोनालीच्या या नव्या प्रोजेक्टसाठी अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: sonali kulkarni marathi actress dubut in south movies malyalam cinema with mohanlal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.