'या' अभिनेत्रीची 'मिर्झापूर: द फिल्म'मध्ये एन्ट्री, मिळाली मोठी संधी; आनंद व्यक्त करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:49 IST2025-10-27T15:49:01+5:302025-10-27T15:49:44+5:30
इम्रान हाश्मीसोबत गाजला होता सिनेमा, कोण आहे ही?

'या' अभिनेत्रीची 'मिर्झापूर: द फिल्म'मध्ये एन्ट्री, मिळाली मोठी संधी; आनंद व्यक्त करत म्हणाली...
'जन्नत' फेम अभिनेत्री सोनल चौहान आठवतेय? इम्रान हाश्मीसोबत तिची जोडी खूप गाजली होती. 'जरा सी दिल मे दे जगह तू' हे त्यांचं गाणं आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे. सोनल चौहानला आता एक मोठी संधी मिळाली आहे. 'मिर्झापूर' या गाजलेल्या सीरिजवर आता सिनेमाही येणार आहे. या सिनेमात सोनल चौहानला भूमिका मिळाली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली आहे.
सोनल चौहानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटकडून मिळालेल्या लेटरचा तिने फोटो दाखवला आहे. ती लिहिते, "ॐ नमः शिवाय...अजूनही विश्वास बसत नाहीये. या अद्भूत आणि गेम चेंजिंग प्रवासाचा मी भाग झाले याचा आनंद आहे. मिर्झापूर:द फिल्म जॉईन करण्यासाठी मी आतुर आहे. स्क्रीनवर नक्की काय जादू घडणार हे तुम्हा सर्वांसमोर उलगडण्याची मी आणखी वाट पाहू शकत नाही. मिर्झापूरच्या जगात मला आणल्याबद्दल रितेश सिधवानी, फरहान अख्तर, गुरमीत सिंह आणि एक्सेल मूव्हीजचे खूप खूप आभार. या आयकॉनिक प्रोजेक्टचा भाग झाल्याने मला खूप आनंद होत आहे."
सोनल पंजाबी सिनेसृष्टीतही पदार्पण करत आहे. 'शेरा' असं सिनेमाचं नाव आहे. यामध्ये ती परमिश वर्मासोबत स्क्रीन शेअर करत आहे. हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत नशीब आजमावल्यानंतर सोनलचा आता पॅन इंडिया भूमिका साकारण्याचा कल आहे.
'मिर्झापूर: द फिल्म'मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी ही कास्ट तीच असणार आहे. बबलू पंडितच्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीने नकार दिला आहे. त्याच्या जागी 'पंचायत' फेम जितेंद्र कुमारला घेतल्याची चर्चा आहे.