सोनाक्षी-जहीरने लग्नासाठी 23 तारखेचीच निवड का केली? फरीदनने पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:15 PM2024-06-24T15:15:54+5:302024-06-24T15:17:03+5:30

Sonakshi-zaheer wedding: सोनाक्षी आणि जहीर यांनी लग्नासाठी २३ जून हीच तारीख का निवडली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यामुळे  या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने स्वत: दिलं आहे.

sonakshi-sinha-zaheer-iqbal-wedding-couple-reveal-reason-of-marrying-on-23rd-june | सोनाक्षी-जहीरने लग्नासाठी 23 तारखेचीच निवड का केली? फरीदनने पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

सोनाक्षी-जहीरने लग्नासाठी 23 तारखेचीच निवड का केली? फरीदनने पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

बॉलिवूडची दबंग गर्ल ते हिरामंडीची फरीदन असा मोठा पल्ला गाठणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोनाक्षीने तिचा लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड जहीर इक्बाल याच्यासोबत २३ जून रोजी लग्नगाठ बांधली. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या जोडीची सध्या चर्चा रंगतीये. यामध्येच सोनाक्षी आणि जहीर यांनी लग्नासाठी २३ जून हीच तारीख का निवडली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यामुळे  या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने स्वत: दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यात खासकरुन तिच्या लूकपासून ते रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांपर्यंत अनेक विविध गोष्टींची चर्चा रंगली आहे. यामध्येच सोनाक्षीने कोर्ट मॅरेजसाठी २३ तारीखच का निवडली हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. मात्र, सोनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

२३ जूनची तारीख निवडण्यामागचं खास कारण

"सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आजच्याच दिवशी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांप्रतीचं प्रेम पाहिलं होतं. आणि, एकत्रपणे नव्या नात्याची सुरुवात करायचं ठरवलं होतं. आज त्याच प्रेमाने आम्हाला सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी मार्ग दाखवला आहे. दोघांच्या कुटुंबाच्या आणि दोन्ही देवांच्या आशिर्वादाने आम्ही आज नवरा-बायको झालो आहोत", असं सोनाक्षीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर या जोडीने कुटुंबासह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर या जोडीने शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात सलमान खान, रेखा, तबू, काजोल असे अनेक सुपरस्टार्स उपस्थित होते.

Web Title: sonakshi-sinha-zaheer-iqbal-wedding-couple-reveal-reason-of-marrying-on-23rd-june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.