सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:06 IST2024-06-24T15:05:21+5:302024-06-24T15:06:24+5:30

सोनाक्षी आणि जहीरची ग्रँड रिसेप्शन पार्टी ही दादरमधील बॅस्टियन या रेस्टॉरेंटमध्ये झाली.

Sonakshi Sinha Wore red silk saree At Her Wedding Reception With Zaheer Iqbal from Raw Mango worth ₹79,800 | सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत रविवारी अर्थात 23 जूनला लग्न केलं. विशेष म्हणजे मुस्लिम किंवा हिंदू नाही तर नोंदणी पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. लग्नानंतर सोनाक्षीनं ग्रँड रिसेप्शन दिलं.  बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी लग्नाच्या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाच्या साडीत दिसली. सर्वांनाच सोनाक्षी सिन्हाचा लूक आवडला.  सोनाक्षीने नेसलेल्या या साडीची किंमत ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. 

सोनाक्षी आणि जहीरची ग्रँड रिसेप्शन पार्टी ही दादरमधील बॅस्टियन या रेस्टॉरेंटमध्ये झाली. या रिसेप्शनसाठी सोनाक्षीचा लूक पुर्णपणे भारतीय थाटातला होता. हातात बांगड्या, काठपदराची साडी, कपाळावर टिकली आणि भांगेत सिंदूर अशा थाटातली सोनाक्षी ही अतिशय देखणी दिसत होती. नवऱ्यानेही पांढऱ्या रंगाचा कुर्ता-जॅकेट असा लूक केला होता. सोनाक्षीने नेसलेली साडी काही साधी-सुधी नसून अत्यंत महागडी बोल्ड रेड शेडची 'चांद बुटा' ब्रोकेड आहे. ज्याची किंमत ७९,८०० रुपये आहे.

याशिवाय, सोनाक्षीने नोंदणी पद्धतीने विवाह करताना पांढऱ्या रंगाची आईची साडी नेसली होती. पूनम सिन्हा यांनी ४४ वर्षांपूर्वी स्वत:च्या लग्नात हीच साडी नेसली होती. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची दिवशी सोनाक्षीने आईच्या साडीसोबत त्यांचा नेकलेस घातला होता. सोनाक्षी आणि जहीरच्या रिसेप्शन  पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, काजोल, रेखा, हिरामंडीची संपूर्ण टीम, चंकी पांडे असे अनेक कलाकार उपस्थित होते. सोनाक्षी आणि जहीरवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.  सोनाक्षी सिन्हा कोट्यावधी संपत्तीची मालकीनही आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे सोनाक्षी आणि जहीर हे दोघेही सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

Web Title: Sonakshi Sinha Wore red silk saree At Her Wedding Reception With Zaheer Iqbal from Raw Mango worth ₹79,800