सोनाक्षी सिन्हा 'कलंक' चित्रपटात 'या' लोकप्रिय गाण्यावर थिरकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 07:15 IST2018-10-13T15:27:48+5:302018-10-15T07:15:00+5:30

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Sonakshi Sinha will spit on the popular song 'Kalaank' | सोनाक्षी सिन्हा 'कलंक' चित्रपटात 'या' लोकप्रिय गाण्यावर थिरकणार

सोनाक्षी सिन्हा 'कलंक' चित्रपटात 'या' लोकप्रिय गाण्यावर थिरकणार

ठळक मुद्दे 'मुंगडा' या गाण्यावर थिरकणार सोनाक्षी सिन्हा


बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या ती अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सोनाक्षी आयटम साँग करताना दिसणार आहे. ती मुंगडा या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 


1977 मध्ये गाजलेल्या 'इनकार' सिनेमातील गाजलेले गाणे 'हा मुंगडा, मैं गुड की कली...'वर अभिनेत्री हेलन यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. हे गाणे 'कलंक' चित्रपटात रिक्रिएट करण्यात आले असल्याचे स्वतः सोनाक्षीने सांगितले. यापूर्वीही सोनाक्षीने हेलन यांच्या एका गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. हॅपी फिर भाग जायेगी चित्रपटातील 'चिन चिन चू' या रिक्रिएट केलेल्या गाण्यावर हेलनने डान्स केला होता. आता पुन्हा एकदा तशाच हिट गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये परफॉर्म करायला मिळणार म्हणून सोनाक्षी खूप खुश आहे. 
मीटूबाबत सोनाक्षीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.ती म्हणाली की, 'जर खरेच शोषण झाले असेल, तर संबंधित महिलांनी जरूर आवाज उठवावा आणि ज्यांच्यावर आरोप केले गेले असतील, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे.'
करण जोहर, साजिद नाडियादवाला आणि अपूर्व मेहता निर्मित 'कलंक' चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल. जवळपास  21 वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा एका चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात सोनाक्षी सिन्हाला 'मुंगडा' या गाण्यावर थिरकताना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Sonakshi Sinha will spit on the popular song 'Kalaank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.