प्रेग्नेंट कतरिना कैफचा लीक झालेला फोटो पाहून संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली - "तुम्ही गुन्हेगारांपेक्षा कमी नाहीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:31 IST2025-10-31T18:30:55+5:302025-10-31T18:31:30+5:30
Katrina Kaif And Sonakshi Sinha : अलिकडेच, कतरिना कैफचा तिच्या घराच्या बाल्कनीत बसलेला एक फोटो लीक झाला आहे. या फोटोवर कतरिनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र हे पाहून सोनाक्षी सिन्हा संतापली आहे.

प्रेग्नेंट कतरिना कैफचा लीक झालेला फोटो पाहून संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली - "तुम्ही गुन्हेगारांपेक्षा कमी नाहीत..."
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच पालक होणार आहेत. नुकतेच या जोडप्याने ही गोड बातमी शेअर केली, ज्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत आणि बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. कतरिना आणि विकी आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्यास प्राधान्य देतात. कतरिनाची प्रसूतीची तारीख जवळ आल्याने ती सध्या मुंबईतील घरी कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
अलिकडेच, कतरिना कैफचा तिच्या घराच्या बाल्कनीत बसलेला एक फोटो लीक झाला आहे. या फोटोवर कतरिनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र हे पाहून सोनाक्षी सिन्हा संतापली आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. विकी आणि कतरिना या दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी, चाहते आपला संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही फोटोग्राफरवर नाराजी व्यक्त केली आहे.
संतापली सोनाक्षी
प्रायव्हसी भंग केल्यामुळे सोनाक्षी सिन्हाने यावर प्रतिक्रिया दिली असून मीडिया पोर्टलच्या या लाजिरवाण्या कृत्याचा तिने कठोर शब्दांत निषेध केला आहे. सार्वजनिकरित्या तिने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ''तुम्हा लोकांना झालंय तरी काय? एका महिलेची तिच्याच घरात, तिच्या संमतीशिवाय, तिचे फोटो काढणे आणि ते सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करणे. तुम्ही कोणत्याही गुन्हेगारापेक्षा कमी नाही. हे लाजिरवाणे आहे.''
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सप्टेंबर महिन्यात पोस्ट शेअर करून त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यांनी एक खूप सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये विकी कतरिना बेबी बंपसोबत दिसत होती. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो खूप व्हायरल झाला होता. सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या तिच्या 'जटाधार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
