"मी आता १६ महिने..."; अखेर फोटो शेअर करुन सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नंसी चर्चांवर सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:13 IST2025-10-17T09:09:31+5:302025-10-17T09:13:48+5:30
सोनाक्षी सिन्हाने फोटो शेअर करुन ती गरोदर आहे का? हे सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"मी आता १६ महिने..."; अखेर फोटो शेअर करुन सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नंसी चर्चांवर सोडलं मौन
गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनाक्षी आणि तिचा नवरा जहीर इक्बाल यांनी याविषयी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. नुकतंच हे दोघे एका कार्यक्रमात स्पॉट झाले होते. तेव्हाही मीडियासमोर यांनी ही चर्चा हसण्यावारी नेली. आता सोनाक्षी सिन्हानेच फोटो पोस्ट करुन याविषयी मौन सोडलंय. काय म्हणाली सोनाक्षी? जाणून घ्या.
सोनाक्षी प्रेग्नंसी चर्चांवर काय म्हणाली?
सोनाक्षीने नुकताच एक फोटो पोस्ट केला. हा फोटो शेअर करुन सोनाक्षीने मजेशीर कॅप्शन लिहून गरोदरपणाच्या चर्चांवर मौन सोडलंय. सोनाक्षी फोटो शेअर करुन लिहिते की, "मानवी इतिहासातील दीर्घकाळ गरोदर राहण्याचा विश्वविक्रम मी मोडला आहे. मीडियानुसार, माझी गर्भधारणा आता १६ महिन्यांची झाली आहे!" केवळ पोटावर हात ठेवून पोज दिल्याने सोनाक्षी गरोदर आहे, अशा चर्चा सुरु झाल्या. यावर तिने हसून टोला लगावला. सोनाक्षीने चाहत्यांना शेवटच्या स्लाइडवर तिची याबद्दलची 'प्रतिक्रिया' पाहायला सांगितली आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
शेवटच्या फोटोत जहीर आणि इक्बाल खळखळून हसताना दिसत आहेत. एकूणच सोनाक्षी आणि जहीरने पापाराझी आणि प्रेग्नंसीची चर्चा करणाऱ्या लोकांना चांगलाच टोला लगावला आहे. सोनाक्षी सध्या गरोदर नाही, हेच यावरुन स्पष्ट होतंय. सोनाक्षीचा आगामी पॅन इंडिया सिनेमा 'जटाधरा'ची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा आज १७ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.